पर्यावरणदिनी हिरवांकुरची भुसावळ न्यायालयात वृक्षारोपणाने सुरूवात

 


 फैजपुर तालुका यावल प्रतिनिधि (सलीम पिंजारी)

नाशिक येथील हिरवांकुर फाउंडेशनच्या वतीने स्वच्छ हरित पर्यावरण व जलसंवर्धन या संकल्पनेतून *हर घर किसान* व *वृक्ष दत्तक* अभियानाची मुहूर्तमेढ भुसावळ न्यायालयाच्या परिसरात सन्माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमान सुनील सुर साहेब यांच्या शुभहस्ते रोवण्यात आली. 

सन्माननीय न्यायाधीश साहेबांनी वड या पौराणिक, आयुर्वेदिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक मान्यता प्राप्त राष्ट्रीय वृक्षाचे रोपण केले.[ads id="ads1"]  

   यावेळी भुसावळ न्यायालयाचे न्यायाधीश माननीय सुनील टी सूर साहेब, जिल्हा न्यायाधीश,  सह दिवाणी न्यायाधीश माननीय आर एस पाजणकर साहेब, सह दिवाणी न्यायाधीश क स्तर  श्रीमती एस व्ही जंगमस्वामी मॅडम, माननीय सह दिवाणी श्रीमती एस व्ही न्यायाधीश मॅडम, श्री महेन्द्र वाणी, वरिष्ठ लिपिक, योगेश पवार  कनिष्ठ  लिपिक तुषार वानखेडे, कनिष्ठ लिपिक  श्री निकुंभ स्टेनोग्राफर, विधीज्ञ, सेवक वृंद सोबत हिरवांकुर टीमचे जिल्हाप्रमुख कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत उपस्थित होते.[ads id="ads2"]  

सद्यस्थितीत अवकाळी पाऊस, बदललेले ऋतुचक्र, भीषण गर्मी अशा महाभयंकर संकटात सापडलेल्या मानव जातीला वाचविण्यासाठी वसुंधरेला हरित अच्छादन करणे, जीवित वृक्षांचे संवर्धन व भारतीय प्रजातीचे कमीत कमी सुमारे ५०० वर्षे जगतील अशाप्रकारच्या दुर्मिळ आयुर्वेदिक दृष्ट्या उपयोगी वृक्षांचे रोपण करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत वृक्षारोपणाची चळवळ पोहोचवावी. सोबत पाण्याचे महत्व जाणून जल संधारण व संवर्धन बाबत जनआंदोलन ऊभे करण्याच्या उदात्त हेतूने *हिरवांकुर टीम*  सरसावली आहे.

 या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री निलयबाबु शाह, सौ नलिनी शहा, सौ राखी शहा यांच्या संकल्पनेतून ग्रीन सिटी जळगावचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयकुमार वाणी, सामाजिक वनीकरण विभाग जळगावचे डी एफ ओ संजय पाटील, बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने *हर घर किसान* व *वृक्ष दत्तक अभियान* साकारण्यात येत आहे.

 याची द्वितीय पायरी म्हणून आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या औचितत्याने माननीय भुसावळ न्यायालय परिसरात माननीय न्यायाधीश महोदयांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतीकात्मक वृक्षारोपणाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली.


 याच्या पुढील टप्प्यात भारतीय प्रजातीचे अतिदुर्मिळ आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे जसे करंजा, बहवा,  रिठा, आपटा, कदंम, शिवण, हिरडा, बेहडा, खैर, काटेसावर इत्यादी लुप्त होत चाललेल्या वृक्षांच्या बाळ रोपांचे वाटप करण्यात येईल. तदनंतर या प्रत्येक वृक्षाचा एक बारकोड निर्माण करण्यात येईल. त्यामध्ये या वृक्षाच्या संपूर्ण माहिती सह पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे नावही बारकोड द्वारे संरक्षित करण्यात येईल. हे नाव वृक्ष जिवंत असेतोवर वृक्षासोबत राहील. या वृक्ष संवर्धनाचा फॉलो अप ही घेतला जाईल. या अभियानाचे विशेष म्हणजे येत्या स्वातंत्र्य दिवसाच्या औचितत्याने एकाच वेळी चाळीस पेक्षा अधिक जिल्हा व तालुक्यात महावृक्षरोपण अभियान साकारलेले जाणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून न्यायालय परिसर, न्यायाधीश विधिज्ञ व सेवक वृंद यांचे निवासस्थान अशा ठिकाणी वृक्षारोपणास जागा उपलब्ध असेल त्या योग्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल. या संकल्पनेत मानवजातीसहितच पशु, पक्षी व प्राणी यांच्या अधिवासासाठीही अनुकूल असलेले वृक्ष लावण्यात येणार असून. त्यांचे बाळ राजा प्रमाणे संगोपन करण्यात येणार आहे. या अभियानाचा माननीय न्यायाधीश महोदय, विधिज्ञ व सेवक वृंद यांनी कौतुक केले आहे. तसेच अत्यंत जबाबदारीने व सर्वार्थाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या अभियानाला जनमानसातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️