राज्यस्तरीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगावची सुवर्ण कामगिरी :पिंप्री ता धरणगाव येथील कु वैष्णवी भाटिया हिचे महिला गटात घवघवीत यश..!


धरणगाव प्रतिनिधी

मुंबई येथे झालेल्या कॅप्टन एस.जे.ईजेकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या कु.हर्षाली राजन पाहुजा हिने दोन सुवर्णपदके पटकावित जळगाव जिल्हयाचे केले नाव लौकिक.[ads id="ads1"]

       जळगाव जिल्ह्याच्या 12 खेळाडूंच्या संघाने या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत अतिशय उत्तम कामगिरी करीत अखिल भारतीय निशाणेबाजीच्या स्पर्धेची पात्रता पूर्ण केलेली आहे.

       कु.हर्षाली पाहुजा हिने 10 मीटर एअर रायफल महिलांच्या वरीष्ठ व ज्युनिअर या दोन्ही गटात 400 पैकी 396 असा सर्वोत्कृष्ट स्कोअर प्रथम क्रमांक मिळवित 2 सुवर्णपदक पटकाविले , जामनेर येथील कु.सिमरा आसिफ खान हिने महिलांच्या सब युथ (एम.क्यु.एस.)गटात 400 पैकी 379 गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला , कु.वैष्णवी अजय भाटिया हिनेही महिलांच्या युथ व सब युथ गटात 400 पैकी 375 असा उत्तम स्कोअर करीत 7 वा क्रमांक मिळवत तीने अखिल भारतीय निशाणेबाजीच्या स्पर्धेची पात्रता पूर्ण केलेली आहे.[ads id="ads2"]

      पुरुषांच्या वरीष्ठ गटात स्पर्धेत 400 पैकी अमोल पद्माकर इंगळे यांनी 364 तर युथ व सब युथ गटात अथर्व श्रीपाद कासार यांने 363 व गगन कमलाकर धांडे याने 362 आणि बुलढाणा येथील अमरीश समाधान सिंगणे याने 361गुन प्राप्त केले आहे.

      वरील सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने त्यांची पुढे होणाऱ्या अखिल भारतीय जि.व्हि.मावळंणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

     कु.हर्षाली राजन पाहुजा व अखिल भारतीय स्तरावरील अ स्पर्धेसाठी पात्र झालेल्या ऋषिकेश अनिल सपकाळे,रोहित विजय तायडे, सिद्दिकी मो.तलहा मो.शफीक,आबीद अहमद शेख मन्सूर यांनी सुध्दा प्रथमच या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेत चांगली कामगिरी केली आहे त्याबद्दल जळगाव जिल्हा रायफल असोसिएशन तर्फे सर्व खेळाडूंचे  अभिनंदन करण्यात आले.यशस्वी सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️