यावल ( सुरेश पाटील ) एका महिलेचे नाव घेतल्याच्या कारणावरून गैरसमज झाला व त्याचा राग आल्याचे कारणावरून भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले यावल येथील २ पदाधिकाऱ्या विरुद्ध फैजपुर पोस्टेला अदखलपात्र खबर क्र. २६१/२०२४ नुसार नोंद झाल्याने यावल तालुक्यातील राजकीय गटात चर्चेचा विषय सुरू झाला आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की फैजपूर येथील शिवकालीतील कुणाल वसंत चौधरी वय ३० यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे की यावल येथील भूषण जगन्नाथ फेगडे,कोमल रवींद्र इंगळे,संदीप नारायण भारंबे यांनी दि.२६ मे २०२४ रोजी रात्री ९ ते ९:३० वाजेच्या दरम्यान फैजपूर येथे शिवकालनीच्या बोर्डाजवळ रोडवर सार्वजनिक जागी तक्रारदार यांनी[ads id="ads2"] गैरतक्रारदार क्रमांक १ याचे वहिनीचे नाव घेतले असा गैर तक्रार क्रमांक १ ते ३ यांचा गैरसमज झाला त्याचा राग आल्याचे कारणावरून खुलासा तक्रार दार यांची तक्रार की वरील तारखेस व वेळी व ठिकाणी तक्रारदार १ ते ३ यांनी गैर तक्रारदार क्रमांक १ याचे वहिनीचे नाव घेतले असा गैर तक्रारदार क्रमांक २ ते ३ यांचा गैरसमज झाला त्याचा राग आल्याचे कारणावरून तक्रारदार यास चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व तू यावलला आला तर तुला जिवंत ठेवणार नाही असा दम दिला वगैरे मजकुरचे तक्रार वरून फैजपुर पोलीस स्टेशनला ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे अदखलपात्र एन सी आर नोंद करण्यात आली.