ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची केली मस्करी : शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप


यावल ( सुरेश पाटील )

हवामानावर आधारित पुनर्रचित फळपीक विमा योजनेत ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळांना डावलून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची मस्करी केल्याचा आरोप यावल तालुका शिवसेना ठाकरे गटाकडून केला गेला असून याबाबतचे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्यामार्फत देण्यात आले.[ads id="ads1"] 

         आज शुक्रवार दि.१४ जून २०२४ रोजी यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात यावल शहरासह तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे की.यावल तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते.गेल्या महिन्यात उन्हाळ्यात ४० ते ४७ अंशांपेक्षा अधिक तापमान झाले होते आणि आहे यामुळे केळी पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो.मे महिन्यातील सरासरी तापमान ४६ अंशांच्या वर राहिले आहे,उन्हाळ्यात अधिक तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान होत असल्याने केळी उत्पादकांना केवळ हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेतून मिळणाऱ्या नुकसान भरपाईतून दिलासा मिळतो.[ads id="ads2"] 

   मात्र संबधीत ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने सन २०२३ -२४ च्या काळात उन्हाळ्यात यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळे हे ४५ अंशांच्या आत दाखवून शेतकऱ्यांची मस्करी केली आहे.यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळांचे १६ ते २५ मे दरम्यानचे तापमान ४६.५ अंशाच्या वर असतानाही कंपनीने मात्र तापमान कमी दाखवून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचीत ठेवले आहे.तालुक्यातील साकळी महसूल मंडळात तर ४ दिवस ४५ पेक्षा अधिक तापमान दाखवून पाचव्या दिवशी ४४.९ अंश तापमानाची नोंद केली आहे.मुळात कंपनीची तापमान मोजणारी यंत्रणा कोठे आणि कोणत्या ठिकाणी आहे ? हेच शेतकऱ्यांना माहित नाही. परिसरातील चोपडा, रावेर, भुसावळ या तालुक्यातील तापमान सलग पाच दिवस ४५ अंशांपेक्षा अधिक असताना यावल तालुक्यात तापमान कमी कमी का आले ? याचा खुलासा कंपनीने करावा. यासोबतच कमी तापमान अर्थात थंडीमुळे झालेल्या नुकसानापासूनही तालुक्याला वंचीत ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील किनगाव व बामणोद या महसूल मंडळांना समाविष्ठ केले,मात्र इतर महसूल मंडळांना वंचीत ठेवले आहे. यासोबतच यावल तालुक्यातील तापमान कंपनीच्या म्हणण्यानुसार कमी असेल तर यावल तालुक्याला थंड हवेचे स्थान म्हणून शासनाने घोषीत करावे, तसेच शेतकऱ्यांना आणि तालुक्याला पर्यटन विकासासाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे.अशी विनंती केली असून यावल तालुका चोपडा व रावेर विधानसभा मतदार संघात विभागला गेला आहे. यामुळे यावल तालुक्याचा कोणीही वाली राहिला नाही.मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गट शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, ८ दिवसाच्या आत संबधीत कंपनीने संपूर्ण

तालुक्यावर झालेला अन्याय दूर नाही केला तर जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटातर्फे तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला असून निवेदनावर जगदीश कवडीवले, संतोष खर्चे, सुनील जोशी, डॉ.विवेक अडकमोल,सागर देवांग,सुनील बारी,नितीन बारी,

सारंग बेहेडे,योगेश वाणी सुनील भोलाणकर,सुशील कुमार नागराज,राजेश श्रावगी, शहाजी भोसले,संजय पाटील, वसंत पाटील,शरद कोळी, घनश्याम भोलाणकर,वसंत पाटील,भगवान चौधरी,एम.के. पाटील,विकास बारेला,प्रदीप भोलाणकर,बाळकृष्ण पाटील, प्रवीण लोणारी,बळवंत निंबाळकर,प्रल्हाद बारी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️