रेल्वेतून पडलेल्या चिमुकली साठी देवदूत ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस बॉईज असोशियन तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात सत्कार आणि सन्मान


यावल ( सुरेश पाटील )

रेल्वेतून खाली पडलेल्या चिमुकलेचे प्राण वाचविण्यासाठी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी फिरोज तडवी हे देवदूत ठरल्याने महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन तर्फे यावल येथील भूषण नगरे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार केला.[ads id="ads1"] 

          रेल्वेतून पडलेल्या चिमुकली साठी देवदूत ठरलेल्या पोलीस कर्मचारी फिरोज तडवी जळगाव जिल्ह्यातर्फे सत्कार आणि सन्मान करण्यात आला याप्रसंगी भूषण नगरे, नदीम शेख, हेमंत तावडे जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते.[ads id="ads2"] 

एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नियुक्तीस असलेले फिरोज तडवी हे पोलीस कर्मचारी शासकीय कामासाठी गुरुवारी पहाटेच्या सुमारास नाशिक येथे जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर उभे होते या ठिकाणी सेवाग्राम एक्सप्रेस आल्यानंतर त्यातून एक महिला आपल्या दोन मुलांसोबत रेल्वेतून उतरत होत्या एक चिमुकला कडेवर असताना दोन वर्षाची चिमुकली मात्र त्यांच्या हातातून निसटल्यामुळे ती थेट रेल्वे खाली रूळावर जाऊन पडली त्यामुळे भेदरल्या मातेने एकच आक्रोश सुरू केला जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर उडी मारली ही घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या फिरोज तडवी यांना समजली दरम्यान रेल्वे एक्सप्रेस गाडीला सिग्नल मिळालेला असताना देखील फिरोज तडवी यांनी आपल्या जीवाची परवा न करता थेट रेल्वे खाली उडी घेतली त्यानंतर रुळावर पडलेली चिमुकलीला सुखरूप बाहेर काढत तिच्या आईच्या ताब्यात दिले

त्यामुळे मराठीत म्हण आहे की " देव तारी त्याला कोण मारी " या म्हणीचा प्रत्यय उपस्थित्यांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवला पोलीस कर्मचाऱ्यांचे या हिंमतीचे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या शेकडो नागरिक महिला प्रवाशांनी कौतुक केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️