यावल ( सुरेश पाटील ) यावल भुसावळ रोडवर गेल्या वर्षभरात काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता बोगस आणि निकृष्ट प्रतीचे बांधकाम झाले, आवश्यक त्या ठिकाणी ठेकेदाराने रस्त्यावर ' लूप ' व्यवस्थित न करता सोयीनुसार काम केले आहे,कामावर कोट्यावधी रुपयाचा खर्च झाला,परंतु ठिकठिकाणी साईट पट्ट्या अजूनही गायब असून मोठमोठे जीव घेणे खड्डे निर्माण झाले आहे ही वस्तुस्थिती लोकप्रतिनिधी,ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना दिसून येत नसल्याने या सर्व यंत्रणेचे संगनमत असल्याचे संपूर्ण भुसावळ विभागात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
यावल भुसावळ रोडवर यावल शहराजवळच जुन्या भुसावळ नाक्याजवळ वळणावर खोलगट चारी पडली आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनधारकांना वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच ठिकाणी दहा ते पंधरा फूट अंतरावर रस्त्याच्या मधोमध ज्या ठिकाणी पाईप टाकला आहे त्या ठिकाणी खड्डा पडला असून या खड्ड्यात एखाद्या वेळेस मोटर सायकल किंवा जड वाहन अडकून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.या वळनाणाच्या आडवी खोलगट चारी निर्माण झाली असली तरी पावसाळ्यात मात्र या ठिकाणाहून पावसाचे पुराचे पाणी वाहून जाणार नसल्याने रस्त्याच्या आजूबाजूस बांधलेल्या बोगस गटारी मातीने पुन्हा पॅक होऊन रस्त्यावरून पाणी वाहील अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी अंदाजे एक किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे जे बांधकाम झाले ते बांधकाम सुद्धा अत्यंत निकृष्ट बोगस झाल्याने तीन ते चार महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला म्हणजे ठेकेदाराला सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरी करण्याचा लेप लेअर टाकावा लागला हे कोणाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. [ads id="ads2"]
याचप्रमाणे राजोरा फाटा ते अंजाळे गावाजवळील हतनूर पाट चारीजवळ असलेल्या मुंजोबास्थानापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे जे बांधकाम झाले त्या रस्त्याच्या आजूबाजूला काम पूर्ण झाल्यावर सुद्धा साईट पट्ट्यांचे बांधकाम ठेकेदारांनी न केल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही टोकावर व्यवस्थित 'लूप ' न केल्याने पावसाळ्यात साधी मोटर सायकल सुद्धा रस्त्याच्या खाली उतरू शकणार नाही अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे परंतु या रस्त्यावरून नेहमी अपडाऊन करणारे अधिकारी,लोकप्रतिनिधी ठेकेदार यांना हे दिसून येत नसल्याने ते आंधळ्याची भूमिका घेऊन एखाद्या वेळेस मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न संपूर्ण भुसावळ विभागात उपस्थित केला जात आहे. तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी,विविध संघटनांनी आपले लक्ष केंद्रित करून जनहित तात्काळ साध्य करावे अशी संपूर्ण भुसावळ विभागातून मागणी होत आहे.