लोहारा सुकी नदीचा घाट फोडतो टाहो.कुणीतरी या घाटाला जीवनदान द्याहो. पुलासह रस्त्याची दयनीय अवस्था: रस्ता डांबरीकरण व पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी

 


 मोठा वाघोदा ता.रावेर प्रतिनिधी(मुबारक तडवी)

रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल  लोहारा हे  आदिवासी पेसा क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.लोहारा व गुली लोहारा अशा दोन गावांना जोडणाऱ्या गावाच्या सुकी नदीच्या पुल घाटाला अनेक वर्षापासून खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे.ह्या घाटातून प्रवास करीत असतांना अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे  सदर पुलाची व रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना सह पादचाऱ्यांना उमगत नसल्याचे जनता त्रस्त झाली आहे.[ads id="ads1"] 

  वारंवार या पुल रस्ता व अपघातांच्या घाटरस्त्याबाबत विविध वृत्त पत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाले तक्रारी करून देखील सबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याच्या अधिकारी .पदाधिकारी.लोकप्रतिनिधी यांनी कुंभकर्णाची झोप घेतली असल्याचे संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशी करीत आहेत.[ads id="ads2"] 

  त्यामुळे या सुकी नदीच्या घाटाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा लोहारा गावकऱ्यांचा आरोप आहे.तरी ह्या घाटात दिवसेंदिवस होणारे अपघात थांबविण्यासाठी रस्ता कांक्रीटीकरण अथवा डांबरीकरण व पुलाची दुरुस्ती किंवा नवीन उंच पुल बांधण्यात यावा.अशी लोहारा येथील गावकरी व परिसरातील जनतेची मागणी आहे

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️