भाजपाचे युवा नेते डॉ.कुंदन फेगडे यांनी यावल शहरात #एक_पेड़_माँ_के_नाम अभियान राबवून केली वृक्ष लागवड


यावल ( सुरेश पाटील)

साधारणपणे,झाडे लावण्याची सर्वोत्तम वेळ पावसाळ्यात असते,जी सामान्यत: जून ते सप्टेंबरपर्यंत असते.कारण माती ओलसर असते आणि पावसामुळे झाडाला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात.विशिष्ट प्रदेश,जिल्हा,तालुका व ग्रामीण भागात आणि मातीच्या प्रकारासाठी झाडांची योग्य प्रजाती निवडून वृक्ष लागवड केली जाते याचे निमित्त साधून तसेच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली #एक_पेड़_माँ_के_नाम हे अभियान यावल येथे डॉक्टर कुंदन फेगडे यांनी आपल्या आई सोबत राबविले.[ads id="ads1"] 

       आज दि.२५ जुन रोजी यावल येथे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली #एक_पेड़_माँ_के_नाम हेअभियान संपूर्ण देशभर राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.त्यानिमित्त यावल येथील भाजपाचे युवा नेते डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांनी आपल्या आई सौं.कलावती सुधाकर फेगडे यांच्या सोबत  वृक्षरोपांची लागवड केली. [ads id="ads2"] 

  यावेळी त्यांच्यासोबत डॉ. प्रशांत जावळे, सुरेश जावळे उपस्थित होते.हि मोहीम निसर्ग वाचविण्यासाठी आहे वृक्ष लागवड करताना भाजपाचे युवा नेते डॉक्टर कुंदन फेगडे यांनी सर्व नागरिकांना नम्रतापूर्वक आवाहन केले आहे कि आपणही या मोहिमेमध्ये सहभागी होऊन निसर्गाच्या संवर्धनात सामील होऊन ठिकठिकाणी वृक्ष लागवड करावी.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️