यावल ( सुरेश पाटील ) यावल नगरपरिषदेच्या अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने सातवे वेतनाची उर्वरित फरकाची रक्कम तात्काळ मिळण्याची मागणी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे आज १० जून २o२४ रोजी निवेदनाद्वारे केली. [ads id="ads1"]
यावल न.प.मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ७ वे वेतनाची फरकाची रक्कम न.पा.कडे शिल्लक आहे ती आम्हाला आज पावेतो मिळालेली नाही. सन २०२३ २०२४ या आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली चांगल्या प्रकारे झालेली असतांना सुध्दा न.पा.कर्मचारी यांना रक्कमा देण्यात आलेल्या नाही.बाकी पाहता जवळचे सर्व न. पा. मध्ये कर्मचाऱ्यांना रक्कमा अदा केलेल्या आहे. तरी आपण एक कार्यदक्ष अधिकारी असल्याने आम्हाला आमच्या हक्काचा पैसामिळावा हि सर्व कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी मार्फत मागणी करीत आहोत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. [ads id="ads2"]
निवेदनावर तालुकाध्यक्ष दिनेश अशोक घारू, यावल तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड शेख मोबिन शेख रशिद,मधुकर पंडीत रणशिंगे,शेख ईसरार शेख मेहमुद,पंकज पिरा भास्कर,धर्मा झगु घारू,दिलीप मोहन बारसे,दिनेश अशोक घारू,नितेश रिवदास चांगरे,महेंद्र जयराज घारू,संदिप सुरेश पारधे,मुकेश काशिनाथ गजरे,नितीन नामदेव पारधे,शेख अन्सार शेख निसार,
केतन हरी पारधे,लखन अरूण घारू,राहुल अरूण चांगरे,सतिष गोपाल चव्हाण,राजेंद्र देवीदास भालेराव, चंद्रकांत नेहमीचंद सरसर,शेख अजहर,महेद्र चव्हाण,राहुल चव्हाण,प्रवीण बारसे, कल्पना घारु,भागवती बारसे,कांताबाई चावरे,लता चव्हाण,भारती घारू,तुलसी चांगरे,कमला घारू, किरण घारू,सीमा बारसे रशिदावी शेख अरब,भारती घारू,सुषमा चव्हाण,प्रिया चव्हाण,वंदना गजरे,रितू तायडे,पूजा चांगरे,रंजना मोरे, शितल घारू,माधुरी घारू इत्यादी एकूण ५० कामगारांची दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी आहे.