जळगाव तालुक्यातील प्रिपाळा येथील मंडळ अधिकारी किरण बाविस्कर ५ हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला

जळगाव तालुक्यातील प्रिपाळा येथील मंडळ अधिकारी किरण बाविस्कर ५ हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला

यावल ( सुरेश पाटील ) आपल्या जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रिपाळा तालुका जळगाव येथील मंडळ अधिकारी किरण खंडू बाविस्कर वय ४७ याने जळगाव तालुक्यातील सावखेडा येथील तक्रारदाराच्या तक्रार अर्जानुसार नावे कमी करून नावे लावून देण्यासाठी १० हजार रुपयाची मागणी केली त्यापैकी ५ हजार रुपयाची लाच घेताना आज गुरुवार दि. ६ जुन २०२४ रोजी जळगाव येथील लाच लुचपत विभाग पथकाने रंगेहात पकडले आज शनेश्वर जयंतीच्या दिवशी शनि महाराज व महसूल मधील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न जुमानता ही लाच खाण्याची घटना घडल्याने संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली.[ads id="ads1"]  

याबाबत सविस्तर माहिती अशी की,यातील तक्रारदार यांच्या वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे ७ / १२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय प्रिपाळा येथे दि.१६ मे २०२४ रोजी रोजी अर्ज केला होता आणि आहे त्यानंतर तक्रारदार दि.२० मे २०२४ रोजी तलाठी कार्यालयात सदर प्रकरणा बाबत चौकशी केली असता यातील आलोसे यांनी ७ / १२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.[ads id="ads2"]  

  त्यानंतर तक्रारदार यांनी दि. २७ मे २०२४ रोजी रोजी लाप्रवि जळगांव कार्यालयात तक्रार दिली.दि.२७ मे २०२४ रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानंतर आज दि.६ जून २९२४ रोजी आलोसे यांना ५ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर रामानंदनगर पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.सापळा व तपास अधिकारी सुहास देशमुख,पोलिस उपअधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.मोबा.नं.880664300, सापळा पथक पी.एस.आय.दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने कारवाई मदत पथक-पो.नि.एन.एन. जाधव ,पी.एस.आय.सुरेश पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर,पो.ना.किशोर महाजन, पोना.सुनिल वानखेडे ,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ.प्रणेश ठाकूर,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.सचिन चाटे 

सदरची कारवाई मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक.मोबा.नं. 91 93719 57391

 माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक मो नं 9404333049 नरेंद्र पवार साो.,वाचक पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.मोबा.नं. 9822627288 यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने (बेकायदा दलालांनी ) त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,जळगांव येथे संपर्क साधावा.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️