आमची शाळा आमचा अभिमान; सुरज वाघरे ( माजी विद्यार्थी )
धरणगाव प्रतिनिधी
धरणगांव : येथील महात्मा फुले हायस्कूल शाळेस पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे एस पवार होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे माजी विद्यार्थी पापा वाघरे, रवी करोसिया, संजय पचेरवार, सुरज वाघरे, प्रल्हाद पचेरवार उपस्थित होते. शाळेकडून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. [ads id="ads1"]
तद्नंतर प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेटी व पेन सह साहित्य भेट देण्यात आले. माजी विद्यार्थी सुरज वाघरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून थोडी अल्प मदत करण्याचा प्रयत्न पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून आम्ही करत आहोत.[ads id="ads2 "]
शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि 'आमची शाळा - आमचा अभिमान' आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुरज वाघरे यांनी केले. मुख्याध्यापक पवार यांनी स्थुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.