धरणगाव : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा गावातील युवकांनी माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या संपन्न केला. [ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेती क्षेत्राची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीचे वैभव प्रत्यक्ष बघता यावे या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धरणगाव शहर तसेच डॉ.हेडगेवार ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी तथा गावातील होतकरू युवकांनी सहभाग नोंदवला. [ads id="ads2"]
या नियोजित दौऱ्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या भेटींचा देखील योग जुळून आला. बारामतीचे खरे वैभव असलेल्या कृषी विज्ञान केंद्राचा १०२ एकर चा भव्य परिसर बघत असतांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक अर्थाने परिचय झाला. अत्याधुनिक पद्धतीने होणारी शेती, ठिबक सिंचन प्रणाली, जैविक खतांचे व्यवस्थापन, शेळी पालन प्रकल्प, साठवण तलाव, मत्सपालन, आधुनिक रोपवाटिका इ. गोष्टी तसेच डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून पशुपालन करण्याची आदर्श पध्दत, दूध काढण्याचे आधुनिक तंत्रज्ञान, दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, बायोगॅस प्रकल्प इ. सर्व बाबींची व्यापक अर्थांने माहिती मिळाली. पवार साहेबांचे वडील बंधू आप्पासाहेब पवार यांच्यापासून सुरू झालेला वारसा पुढे नेण्याचं कार्य आजतागायत जोमाने सुरू आहे. शिक्षण तसेच औद्योगिक क्षेत्रातील बारामती शहराची प्रगती उल्लेखनीय आहे. या सर्व गोष्टींचा याची देही याची डोळा अनुभव घेऊन तसेच नवीन उत्साह व काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून युवक धरणगावी परतले.
या अभ्यास दौऱ्यात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मोहन पाटील सर, डॉक्टर सेलचे अध्यक्ष नितीन पाटील, अमोल रेसिडेंसी चे संचालक अमोल हरपे, खिदमत फाउंडेशन चे अध्यक्ष नईम काझी, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, मोहित पाटील, दिनेश भदाणे, वैभव बोरसे, विक्रम पाटील, प्रफुल पवार, गौरव चव्हाण, सागर भामरे, सागर चव्हाण, चेतन पाटील, अमोल पाटील, निखिल पाटील, अजय बोरसे, सागर महाले, विलास नन्नवरे, हरिष विसावे, प्रथमेश पवार, शुभम शुक्ला आदी समाविष्ट होते.