मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगावातील सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप ? ठाकरे गटाने व्हिडिओ शेअर करत केला गंभीर आरोप

 

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगावातील सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी थेट व्हिडिओच शेअर करून खुलासा केला आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोग आता कुठे आहे? असा गंभीर प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित केला आहे.[ads id="ads1"] 

महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे दिनांक २२ जून रोजी सभा झाली. या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले", असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच निवडणूक आयोग आता कुठं आहे? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.[ads id="ads2"] 

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या 26 जून रोजी होणार आहे. यानिमित्त काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रात्री जळगावातील आदित्य लॉन येथे सभाही घेतली. या सभेला जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते. मात्र सुषमा अंधारे यांच्या आरोपाने आता खळबळ उडाली आहे.

सुषमा अंधारे यांनी काय केले ट्विट?

सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर यासंदर्भात महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्सला सभा झाली. या सभेनंतर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले", असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच निवडणूक आयोग कुठं आहे? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️