आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मुक्ताईनगर मतदारसंघात ८७६ कोटींची विकास कामे ; विकासकामांत सावदा शहराचाही समावेश

 


मुक्ताईनगर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मुक्ताईनगर मतदारसंघात विविध विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे ८७६ कोटींच्या विकासकामांत सावदा शहराचा ही समावेश आ. चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

 सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी 

मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सावदा विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकारांच्या बैठकीत हितगूज करत असताना आपणास शहराच्या चहूबाजूची माहिती असते. तसेच शहराच्या विस्तारात झालेली वाढ, त्यात कोणत्या ठिकाणी विकास कामे झालेली आहे किंवा बाकी आहे. त्या अनुषंगाने त्यांनी उपस्थित पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी सुचविलेली विकासकामे करण्यासाठी आ. चंद्रकांत पाटील कटीबद्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी उपस्थित होते.[ads id="ads1"] 

आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सावदा शहराच्या विकासासाठी १० कोटी ३० लाखांचा निधी मिळालेला आहे. बहुतांश कामे झालेले आहे. काही विकास कामे प्रशासकीय बाबींमुळे संथगतीच्या श्रेणीत आहे. ही कामे जलदगतीने होण्यासाठी शासकीय स्तरावर जोरदारपणे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. [ads id="ads2"] 

  शहर व विस्तारीत भागात स्ट्रीट लाईटांचा पूर्णतः अभाव - आहे, असे पत्रकार फरीद शेख यांनी सुचविल्यावर त्याची दखल घेऊन त्या भागात लवकरात लवकर डिपीटीसी जळगावमधून स्ट्रीट लाईट मंजूर न करण्यात येईल. ते तुर्त लावण्यात येतील, असे आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️