फैजपुर तालुका यावल प्रतिनिधि (सलीम पिंजारी)
आज दिनांक:-30 मे 2024 रोजी हिरवांकुर फाऊंडेशन नाशिक, दिवाणी व फौजदारी न्यायालय मुक्ताईनगर, तालुका वकील संघ मुक्ताईनगर, ग्रीन फाउंडेशन व सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात "*वृक्ष लागवड आणि संवर्धन या संदर्भात मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. [ads id="ads1"]
सदर शिबिरास मुक्ताईनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश श्री. जी. ओ. वानखडे साहेब हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तथा राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत हे त्यांच्या सुविद्य पत्नी समुपदेशिका तथा हिरवांकुर महिला विभाग अध्यक्षा सौ. सोनाली राजपूत यांच्यासह हजर होते. यावेळी माननीय न्यायाधीश श्री. जी. ओ. वानखडे साहेब यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन*पाण्याची बचत व स्वच्छतेची गरज यासंदर्भात अमूल्य मार्गदर्शन करून आपल्या भारतीय प्रजातीच्या वृक्षांचे आयुर्वेदिक महत्त्व घरोघरी पोहोचून रोजगार निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले. [ads id="ads2"]
तसेच कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी सुद्धा यावेळी वृक्ष लागवडी सोबत हिरवांकुरचा मुख्य उद्देश *हर घर किसान संकल्पनेतून घरोघरी शेतकरी निर्माण व्हावा याबाबत महत्त्व सांगून अमूल्य मार्गदर्शन करून दिनांक :-15 ऑगस्ट 2024 रोजी सर्वांनी जास्तीत जास्त रोप दत्तक घेण्याचे तसेच जीवनात प्रत्येकाने किमान 100 वृक्षांची लागवड व संगोपन करून पर्यावरण संवर्धनाचे ऋण फेडन्याचे कार्य करावे. याची स्तुत्य उपक्रमाची सुरुवात लोकशाहीच्या महत्वाच्या आधार स्तंभ असलेल्या न्यायमंदिरातून केली असून पृथ्वीवरील समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी एक छोटे का असेना परंतु प्रेरणादायी कार्य करण्याचा संकल्प समस्त विधिज्ञ मंडळीने केला. यावेळी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी भारतीय वृक्षांच्या प्रजातीं, त्यापासून निर्माण होऊ शकणारा रोजगार व असलेले अनेक फायदे याची सखोल अशी माहिती असलेली सुंदर पुस्तिका *हिरवांकुर*भेट म्हणून दिली. सदर शिबिरास मुक्ताईनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश श्री. जी.ओ. वानखडे साहेब हे अध्यक्ष म्हणून लाभले होते तसेच सरकारी वकील श्री. निलेशजी जाधव साहेब, वकील संघाचे जेष्ठ सदस्य ऍड. श्री.अरविंद कुमार गोसावी सर तसेच मुक्ताईनगर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. श्री. देविदास काळे, उपाध्यक्ष ऍड. श्री. रमेश हागे, सचिव ऍड.श्री. विनोद इंगळे ,कोषाध्यक्ष ऍड.श्री. ललित पुजारी, तसेच वकील संघाचे सदस्य ऍड.श्री.एस.एम. तायडे ,ऍड. श्री. संतोष इंगळे ,ऍड.श्री. तुषार पटेल ,ऍड. श्री. उमेश जवरे , ऍड. श्री. कुणाल गवई, ऍड.श्री. संतोष कोळी, ऍड. श्री.अशोक बोदडे ,ऍड. श्री. धीरज पानपाटील,ऍड. श्री.अजय निकम ,ऍड. श्री. पंकज हेरोळे, ऍड. श्री. जगदीश निकम हे सर्व विधिज्ञ मंडळी तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी हिरवांकुर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री निलयबाबु शाह, ग्रीन सिटी जळगावचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय वाणी व सामाजिक वनीकरण विभागाचे डी एफ ओ श्री संजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.