पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा संपन्न



 जळगाव : शहरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवि जळगाव येथे इयत्ता पहिलीच्या मुलांचा प्रवेश सोहळा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.  सुरुवातीला शाळेच्या प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी शाळा व वर्गखोल्या सुशोभित केल्या.  इयत्ता पहिलीची मुले असल्याने मुलांना आकर्षक वाटेल अशी सजावट शाळेत करण्यात आली.  मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक "सेल्फी पॉइंट" तयार करण्यात आला आहे.   [ads id="ads1"] 

  मुलांचे गुलाबपुष्प, पेन्सिल व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.  शाळेतर्फे पहिलीतील मुले व त्यांच्या पालकांसाठी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वागत गीत, स्वागत नृत्य आदी उपक्रम झाले.  शाळेशी संबंधित सर्व माहिती "पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन" द्वारे पालकांना देण्यात आली.  कार्यक्रमाच्या मध्यभागी पालकांना चहा, नाश्ता देण्यात आला.[ads id="ads2"] 

    कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्राचार्य सोना कुमार यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधित करून मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा डागर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन एकनाथ सातव सर यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक विभागाच्या शिक्षक व शिक्षिका मीनाक्षी माधवराव पाटील मॅडम, पूनम खरात मॅडम, संतोषकुमार बनकर सर, अजली मॅडम, मिथुन ढिवरे सर यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️