देशी विदेशी,वाईन सेंटर, परमिट रूम बियरबार विक्रेत्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागात जोरदार चर्चा
यावल ( सुरेश पाटील ) गेल्या ३ दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यात भुसावळ विभागात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक यांचे भरारी पथक चौकशी कामी आले असता त्यांनी आपल्या वरिष्ठांची परवानगी घेतली होती किंवा नाही..? किंवा जिल्ह्यात कुठे कुठे कारवाई, कार्यवाही केली याबाबत भुसावळ विभागासह जिल्ह्यातील देशी विदेशी,वाईन सेंटर,परमिट रूम बियर बार चालक-मालक यांच्यासह जळगाव जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की पुणे येथे अपघाताची घटना घडल्याने ती घटना संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाली होती आणि आहे त्याची दखल घेत समय सूचकता बाळगून मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परिपत्रक क्र.११२०२२ / निरीक्षण / १६९ / सात मुंबई, दि. २१ मे २०१४ संदर्भांनुसार राज्य उत्पादन शुल्क जळगाव जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या संपूर्ण जिल्ह्यात तसेच भुसावळ दुय्यम निरीक्षक यांनी भुसावळ विभागातील सर्व परवानाधारकांना दि.२५ मे २०२४ रोजी लेखी पत्र देऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या आणि आहेत,त्यानुसार विभागात विशेष करून सावदा,फैजपुर भुसावळ, मुक्ताईनगर,बोदवड परिसरात सर्वांना परिचित असलेले काही ठराविक देशी विदेशी दुकानदार आपले दुकाने केव्हा उघडतात..? आणि दुकाने केव्हा बंद करतात,देशी विदेशी मालाचा स्टॉक कुठून कुठे कोणत्या नियमानुसार कोणत्या वेळेला आणि कोणत्या वाहनातून वाहतूक करतात..? देशी व विदेशी दारू तसेच बियर विकताना कोणत्या वयोगटातील मद्यपीना विक्री करण्यात येत आहे कोणाकोणाला मद्यपिण्याचे परवाने दिले जात आहेत आणि इतर अटी शर्ती नियमानुसार देशी विदेशी दारू विक्री होत आहे किंवा नाही,मद्य विक्री अनुज्ञप्तीच्या वेळेप्रमाणेच विक्री करीत आहे किंवा नाही, ताडीचे दुकाने शासनमान्य नियमानुसारच सुरू आहे का..? याची चौकशी व कारवाई करण्यासाठी नाशिक विभाग स्तरावरील भरारी पथक गेल्या तीन दिवसापूर्वी भुसावळ विभागात कारवाई करण्यासाठी आले होते.परंतु भरारी पथकाने नेमकी कुठे आणि कोणावर काय कारवाई केली..? [ads id="ads2"]
हे मात्र समजून न आल्याने आलेल्या भरारी पथकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती किंवा नाही..? इत्यादी अनेक प्रश्न राज्य उत्पादन शुल्क कार्यक्षेत्रात तसेच सर्व प्रकारच्या मध्य विक्रेत्यांमध्ये उपस्थित केले जात आहे. आणि भरारी पथक आल्यानंतर नेमकी कारवाई कोणावर आणि कुठे झाली..? याची माहिती तरी भरारी पथकाने आपल्या वरिष्ठ कार्यालयात दिली का..? आणि भरारी पथकाने जळगाव जिल्ह्यात जाताना आपल्या वरिष्ठांची परवानगी घेतली होती का..? याची चौकशी नाशिक विभाग नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, उपायुक्त यांनी करून मद्य विक्री व्यावसायिकांच्या व नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करावे असे सर्व स्तरातून बोलले जात आहे.