रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपा डॉ.कुंदन फेगडे यांना की अमोल जावळे यांना संधी देणार..? सर्वांचे लक्ष वेधून

 

यावल ( सुरेश पाटील )

आगामी विधानसभा निवडणुक लक्षात घेता रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी तर्फे प्रथमदर्शनी सर्व स्तरातील नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात व चर्चेत असलेले आणि " जनसेवा हीच ईश्वर सेवा " मानणारे यावल येथील डॉ.कुंदन सुधाकर फेगडे आणि भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांचे नाव जनमानसातून पुढे येत असले तरी यापैकी कोणाला संधी द्यावी याबाबत मात्र भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांना आणि संबंधितांना निर्णय घेताना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असून या दोघांपैकी उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत राजकीय दृष्ट्या चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र आणि वस्तुस्थिती भारतीय जनता पक्षात निर्माण झाली आहे.[ads id="ads1"]  

         नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी उमेदवारी निश्चित करताना रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे अमोल जावळे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची मतदार संघात जोरदार चर्चा होती परंतु ऐन वेळेला रक्षाताई खडसे यांचे नाव निश्चित झाल्याने मतदार संघात काही ठिकाणी तीव्र नाराजी व आरोप प्रत्यारोप सुरू होऊन प्रसिद्धी माध्यमातून तसे संघर्षाचे चित्र सुद्धा निर्माण झाले होते परंतु पक्षश्रेष्ठींनी ते विरोधाचे वातावरण शांत करून लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी रक्षाताई खडसे यांचे कायम ठेवले हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. आणि रक्षाताई खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाल्या याचा अनुभव संपूर्ण राज्यातील राजकारणाला आणि नागरिकांना आला.[ads id="ads2"]  

         यामुळे आता रावेर विधानसभा मतदार संघातील जनमानसात सुरू असलेल्या सर्वेक्षणात रावेर विधानसभा जागेवर भाजपाचा उमेदवार विजयी होईल असा राजकीय अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,आणि चर्चेत असलेले डॉक्टर कुंदन फेगडे आणि अमोल जावळे यांच्या कामकाजाविषयी आणि यांच्यात सर्वात अधिक जास्त प्रबळ कोण ठरणार याबाबत आता सर्व स्तरातून चर्चेला उधाण आले आहे.

     आज रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक असले तरी प्रत्येक टर्मला नवीन आमदार निवडून देणाऱ्या रावेर व यावल तालुक्यातील जनता २०२४ मध्ये नेमके कोणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

   स्व.माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्याने भाजपाची येथे पडलेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षश्रेष्ठी डॉ.कुंदन फेगडे किंवा अमोल जावळे यांच्या पैकी कोणाला आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.कारण रावेर यावल विधानसभा मतदारसंघ २०१९ ला भाजपाचे सीटिंग आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांचा पराभव करून कॉग्रेस पक्षाने येथे विजय मिळविला आहे.प्रत्येक टर्मला रावेर विधानसभेतील जनता मागील ४० वर्षा पासुन नवीन उमेवदाराला येथून संधी देत आली आहे.त्यामुळे येथे भाजपाचे होप्स वाढले आहेत.

यात सर्वात प्रथम नाव येते ते शहरी भागातून यावल येथील डॉ.कुंदन फेगडे,मागील टर्म पासून भाजपा कडून इच्छुक असुन रावेर मतदारसंघात ते सतत सर्व स्तरातील समाजातील नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात राहून समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मान्य करून सक्रीय आहेत आणि त्याचे आश्रय फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विविध उपक्रम प्रत्यक्ष सुरू सुद्धा आहेत,मतदारसंघात जनतेच्या ते थेट संपर्कात आहे. त्यांचा नियमित दैनंदिन प्रवास आणि गाठीभेटी सुद्धा सुरू आहेत दोन्ही तालुक्यातील नागरीकांना आरोग्य संदर्भात कोणत्याही समस्येसाठी डॉ. कुंदन फेगडे धावून जातात तसेच पक्षामध्ये देखिल डॉ. फेगडे सक्रीय आहे.मागील विधानसभा निवडणुकीत देखिल भाजपा पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी उमेदवारी मागितली परंतु त्यावेळी स्व.जावळे यांना उमेदवारी मिळाली होती.यावेळी डॉ.फेगडे यांचा विचार भाजपा करू शकतो.तर दूसरे नाव स्व.हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांच आहे.दूसरी चर्चा अशीही आहे.की पुढच्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत भाजपा रावेर लोकसभेत भाजपाकडून अमोल जावळे यांना संधी दिली जाऊ शकते अशी देखिल चर्चा सर्वसाधारण जनतेत आहे या दोख नावा पैकी आज तरी रावेर विधानसभा मतदारसंघात जनतेच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या नेतृत्वाचे नाव अजून तरी जनतेला दिसून येत नसल्याने विधानसभेत मात्र या दोघा नावांपैकी कोणाला संधी द्यावी..? या दोघांपैकी जनतेच्या संपर्कात सतत कोण आहेत आणि कोण सामाजिक राजकीय कामे करीत आहेत..! याचा आढावा घेऊन निर्णय घेणे बाबत भाजपाच्या प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठीना चांगलाच मोठा कस लागणार असल्याचे स्पष्ट चित्र रावेर विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे.


         डॉ. कुंदन फेगडे आहेत सतत जनतेच्या संपर्कात - 


• मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर : २०१६ पासून सुरुवात तपासणी ३०००, शस्त्रक्रिया ५००


• आरोग्य शिबीर : २०१२ पासून यावल- रावेर तालुक्यात

• सत्कार समारंभ मार्गदर्शन शिबिरे, रोजगार मेळाव्याचे आयोजन.

• महाआरोग्य शिबीर फैजपूर : आश्रय फाउंडेशन तर्फे रुग्णांची गल्लोगल्ली तपासणी करुन आवश्यक ऑपरेशन

मुंबईत करुन देण्यात आलीत.

• आदिवासीपाड्यांत जनजागृती : विविध शिबीरे घेण्यात आली.

• ई श्रम कार्ड नोंदणी आणि कार्ड वाटप : ८००० लोकांना

• कोरोना काळात फैजपूर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आश्रय हॉस्पिटल उभारुन सवलतीत उच्च दर्जाची सेवा.

• १०,००० मास्क वाटप.

• कोरोना काळात एक दिवसही विश्रांती न घेता सेवा देण्याची इच्छा व्यक्त करुन पूर्ण करुन दाखवली.

• आश्रय फाउंडेशन माध्यमातून लॉकडाऊन १ मध्ये ५० विस्थापित आणि बेरोजगार कुटुंबांना सकाळ संध्याकाळ

अन्नदान! स्वत: ८० कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप.

प्रत्येक सण-उत्सवात नागरिकांबरोबर प्रत्येक संकटाच्या वेळी नागरिकांबरोबर सुख दुःखात वेळ घालवणे हा छंद.

• यावल - रावेर तालुक्यात महारोजगार मेळाव्याचे आयोजन इत्यादी अनेक उपक्रमातून डॉक्टर कुंदन फेगडे हे संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघात सर्व स्तरातील जनतेच्या संपर्कात आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️