अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील महिला शेतकऱ्यांच्या उपोषणाला भारतीय जनसंसद व शेतकरी संरक्षण समितीचा पाठिंबा

 


यावल ( सुरेश पाटील )

भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक सब्बन यांच्यासह महाराष्ट्र राज्य शेतकरी संरक्षण समिती व चंद्रपूर येथील भारतीय जनसंसद जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव बदखल यांनी अमरावती येथील मुख्य वन संरक्षक यांना दि.१० जून २०२४ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,[ads id="ads1"] 

मौजा पुसला येथील बेबी बीडकर व सुशिला बीडकर या महीला शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालय वरुड येथे सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देत आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की वन्य प्राणी पिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वेळेवर न देणे,पिक नुकसान भरपाईच्या अर्जानंतर वेळेच्या आत पंचनामा न करणे, पंचनाम्याला पंचनामा कमिटीचे तिनही सदस्य शेतात हजर न होणे,पंचनाम्या नंतर जी ठरलेली रक्कम व पिक नुकसान मोजमापी नुसार किंटल / कीलो बाजार भावा

नुसार त्याची किंमत ठरवून ती रक्कम ३० दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करणे.शेतकऱ्यांच्या तक्रारी बाबतीत पंचनामा कमिटीला अडचण आल्यास शेतकऱ्यांना लीखीत न कळविणे ही सरळ सरळ पिक नुकसानीचे कायद्याचे उल्लंघन आहे.[ads id="ads2"] 

  असे वन कर्मचान्यांनी व पंचनामा कमिटीने कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर शेतकऱ्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली त्यावर वरिष्ठांनी कोणतीही कार्यवाही न करणे, चौकशी न करणे हे कायद्याला न जुमानणे यासारखे गुन्हे

करुनही शासन त्यांना कोणतीही शिक्षा करीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर विशेषता महीला शेतकऱ्यांना टोकाची भुमीका घेवून आमरण उपोषणासारखे निर्णय घ्यावे लागतात.

      यासाठी शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सतत २६ वर्षे शासन व प्रशासनाशी लढा देत आहे.आताही या महीला भगीनींच्या आमरण उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकत्यांसह जाहीर पाठींबा देत आहो.जर या महीलांवर 

झालेला अन्यायावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आदोलन केले जाईल.याला सर्वस्वी जबाबदार वन अधिकारी व वन कर्मचारी राहील याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी असे शेतकरी संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य व भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठलराव बदखल यांचे वतीने निवेदना व्दारे कळविले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️