मोठा वाघोद्यात शुध्द पाण्यासाठी सुपे कुटुंबियांनी स्वमालकीची ट्युबवेल ग्रामपंचायतीच्या सेवेत समर्पित : माजी उपसभापती भरत सुपेंची अनमोल जलसेवा


 मोठा वाघोदा प्रतिनिधी/मुबारक तडवी 

मोठा वाघोदा येथील प्रगतशील शेतकरी कैलासवासी वसंतसेठ सुपे यांचे सुपुत्र तर स्वर्गवासी गोटूसेठ सुपे यांचे लहान बंधू तसेच रावेर पंचायत समितीचे उपसभापती भरत भाऊ वसंतराव सुपे यांनी स्वमालकीची ट्युबवेल गावाला शुध्द व क्लोरिनेशन केलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेसाठी रावेर रस्त्यावरील केळी गोडामधील अतिउपयुक्त कुपनलिका ग्रामपंचायत प्रशासनास निस्वार्थ मोफत जनसेवा करण्यासाठी विनाअट जलधर्म म्हणून २४ तास उपलब्ध करून दिली.[ads id="ads1"] 

  या ट्युबवेल द्वारे दिवसरात्र २हजार लिटर पाणी क्षमतेचे दैनंदिन १०ते १२ टॅकरद्वारे दररोज १५ ते १८ हजार लिटर पाणी सलग २२ दिवसांपासून ना विजेच्या बिलाची काळजी करता ना स्वताच्या केळी व्यावसायाला लागणार पाण्याची काळजी नाही करत निस्वार्थी जलदूत बनत जलसेवा गावकर्यासाठी ग्रामपंचायत ला सेवेत उपलब्ध करून दिली वडिलोपार्जित सर्वसामान्यांच्या सदैव सुखादुखात सहभागी होणारे सुपे कुटुंबिय पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत ओळखी अनोळखी अपघात ग्रस्तांना घटनास्थळावरून उचलून स्वताच्या वाहनांनी उपचारार्थ दवाखान्यात दाखल करणे वेळप्रसंगी गरीब निराधारांची औषधोपचार दवाखान्याची बिलाची रक्कम ही स्वताचे खिशातून देतात *दुखीयोके दाता*म्हणून ही गाव परिसरात सुपे कुटुंबियांनी ओळख निर्माण केली आहे जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे प्रमाणे स्वर्गवासी आजोबा दत्तात्रेय सुपे वडील स्वर्गवासी वसंतराव सुपे जेष्ठबंधू दिवंगत काशिनाथ उर्फ गोटूसेठ सुपे यांचा निस्वार्थी सेवेचा वारसा रावेर पंचायत समितीचे माजी उपसभापती भरत भाऊ वसंतराव सुपे व पुतणे कुंदन काशिनाथ उर्फ गोटूसेठ सुपे हे आजतागायत जोपासत आहेत निस्वार्थ सेवा गोरगरिबांना तन मन धनाने सदैव मदतीने जनमाणसांच्या मनात घर केलेलं सुपे कुटुंबियांनी नावलौकिकता प्राप्त केलेली आहे.[ads id="ads2"] 

  सदर जलसेवा मोठा वाघोदा येथे दि २१ मे पासून रमाई नगर गणेश नगर मोठा वाडा आंबेडकर नगरात ग्रामपंचायत च्या दुषित पाणी पुरवठा व अति तापमान आणि उष्णतेमुळे  गॅस्ट्रो सदृश आजाराची साथ पसरली होती  गावात जिल्हाधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी सिईओ डिएचओ टिमओ वैद्यकीय अधिकारी यांचे ५०अधिकार्यानी गॅस्ट्रो सदृश आजाराची साथ पसरलेल्या परिसरातीलसाथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत चे पाईप लाईन द्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करून टॅकरद्वारे शुध्द व क्लोरिनेशन केलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश दिले होते त्याच पार्श्वभूमीवर दि २१ मे पासून १० जून पर्यंत गावकऱ्यांना शुध्द पाणी पिण्यासाठी व्हावा या उद्देशाने भरत भाऊ वसंतराव सुपे यांनी स्वमालकीची ट्युबवेल गावाला पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत चे सेवेत उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थासह ग्रामपंचायत प्रशासनाने ही त्यांचे आभार मानले व सुपे कुटुंबियांनी ही गावाला कधीही पाण्याची गरज भासणार असेल तेव्हा आम्ही सेवेत उपलब्ध राहू असेही सांगितले

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️