350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा व जागतिक नेत्रदान दिनानिमित्त विवरे येथे निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : 350वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा व जागतिक नेत्रदान दिनानिमित्त ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र विवरे खुर्द आणि  समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 10 जून सोमवार रोजी आयोजित करण्यात आले.या शिबिरात रुग्णांची निशुल्क तपासणी आली.[ads id="ads1"] 

  मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची निशुल्क शस्त्रक्रिया ,राहण्याची, येण्या जाण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत विवरे खुर्द येथे करण्यात आले.जवळपास 125 लोकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला त्यापैकी 68 मोतीबिंदूचे पेशंट आढळले. [ads id="ads2"] 

  शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच सौ स्वरा पाटील, उपसरपंच नसिमबी शेख शरीफ, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, दीपक गाढे ,सुभाष पाटील, ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील,कांताई नेत्रालय जळगाव तर्फे डाॅ ज़की शेख, गजानन खेवलकर, प्रशांत वराडे. समता फाऊंडेशन चे चेतन दुसे.आरोग्य उपकेंद्र विवरे खुर्द समुदाय वैद्यकीय अधिकारी गणेश कचरे, आरोग्य सेवक शुभम महाजन, आशा कार्यकर्ती, पोलीस पाटील योगेश महाजन, तंटामुक्ती अध्यक्ष भागवत महाजन,राजेंद्र चौधरी, घनश्याम बखाल, पत्रकार अनिल मानकरे ,ग्रामपंचायत कर्मचारी प्रल्हाद लोखंडे, दिनेश पाटील, कुंदन पाटील यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️