हरवलेल्या अल्पवयीन मुलाला शोधण्यास रावेर पोलिसांना यश


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर पोलीस स्टेशन (Raver Police Station) कडील गुरनं २३१/२०२४ भादवि कलम ३६३ प्रमाणे मधील हरविलेल्या ०८ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा शोध घेवुन त्याचे परिवाराचे ताब्यात देण्यात आला. रावेर पोलीस स्टेशन (Raver Police Station) येथे दिनांक रोजी २७/०५/२०२४ सीसीटीएनएस गुरनं. २३१/२०२४ भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.[ads id="ads1"]  

   सदर गुन्ह्यात वाघोड ता. रावेर  (Waghode Tal Raver Dist Jalgaon) येथील भिमसिंग पारसिंग बारेला यांचा नातु रुपेश भगवान बारेला वय ०८ वर्ष हा दिनांक २४/०५/२०२४ रोजी चे दुपारी सुमारे ०२.३० वाजे पासुन बाजारातुन कोणास काहीएक न कळविता कोठेतरी निघुन गेला होता. रुपेश ची मानसिक स्थिती अस्थिर असल्याने तो या पुर्वी देखील घरातुन निघुन गेलेला होता व त्यानंतर तो चार दिवसांनी पुन्हा घरी आलेला होता. परंतु यावेळी तो गेला तसा दिनांक २७/०५/२०२४ रोजी पर्वत देखील घरी आला नाही त्याचा शोध त्याचे परिवाराती लोक परिसरात घेत होते. परंतु रुपेश हा कोठेही मिळून येत नसल्याने व त्यांना त्याची चिंता होत असल्याने त्यांची खात्री झाली होती की रुपेश यास कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवुन फुस लावुन पळवून नेले आहे. म्हणून रुपेश याचे काका अर्जुन भिमसिंग बारेला यांचे फिर्याद वरुन वर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. [ads id="ads2"]  

  रावेर पोलीस स्टेशन (Raver Police Station) हद्दीतील खानापुर, चोरवड, पाल, अजंदा, कुसुंबा, पाडला अशा आजुबाजुच्या परीसात देखील सातत्याने शोध सुरु होता, शोध घेत असतांना खानापुर(Khanapur ) येथील बस स्टॉप परिसरात सदर अपद्युत मुलास काही दुकानदारांनी पाहील्याचे त्यांनी कळविले त्यानंतर सदर मुलाचा शोध घेत असतांना तो यावल तालुक्यातील धुळ्या पाडा गावात असल्याबाबत माहीती मिळाली. सदर मुलास सुखरुपपणे धुळ्या पाडा ता. यावल येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर सदर मुलास त्याचे परीवाराचे ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याच्या तपासकामी मा. सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग व रावेर पोलीस स्टेशन चे (Raver Police Station)सहायक पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांचे मार्गदर्शनाखाली उपनि. प्रिया वसावे यांनी केला. तपासात रावेर पोलीस स्टेशन कडील पोहेकॉ/२६५४ अर्जुन सोनवणे, पोकों/८७८ सचिन घुगे, पोकों/४०३ रविंद्र भामरे यांनी मदत केली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️