मुक्ताईनगर(सुवर्ण दिप वृत्तसेवा ) : मुक्ताईनगर शहरात प्रवज्जा फाऊंडेशन, नायगांव च्या वतीने 53 जोडप्यांचा विशाल 12 वा बौध्द धम्मीय सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला. सर्व प्रथम तथागत बुद्ध, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मंचावरील उपस्थित मुख्य मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
त्यानंतर सर्व मान्यरांचा शाल व पुष्पबुके देऊन स्वागत समारंभ करण्यात आला, त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक मा.अर्जुन तायडे गुरुजी यांनी बौध्द पद्धतीने 53 जोडप्यांचे विवाह विधी गाथा म्हणुन संपन्न केला.[ads id="ads1"]
सर्व विवाहबद्ध होणार्या जोडप्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष,योगराज कंट्रक्शन मुक्ताईनगर चे सर्वेसर्वा मा.विनोदभाऊ सोनवणे यांनी आशिर्वाद पर मार्गदर्शन केले
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक मा.अ.फ.भालेराव सर,सिद्धेश इलेक्ट्रोमेक कंपनी चे संचालक मा.दिपरत्न तायडे सर ,समाज कल्याण विभाग अधिकारी मा.अडकमोल मॅडम, सेवानिवृत्त अधिकारी मा.बि.डी.गवई सर,सावदा येथील माजी नगराध्यक्ष मा.सौ.नंदाताई लोखंडे मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.लक्ष्मीताई मेढे मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.प्रतिभाताई मोरे मॅडम, दादासाहेब एन.जी.शेजोळे साहेब,माजी पोलिस उप निरीक्षक मा.श्रिराम पोहेकर साहेब,प्रोटाॅन चे राज्य उपाध्यक्ष मा.गणेश काकडे सर, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन पेंशनर्स संघाचे जळगांव जिल्हाध्यक्ष मा.आर.बी.परदेशी सर या सर्वांनी मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विनोदभाऊ सोनवणे (योगराज कंट्रक्शन मुक्ताईनगर),मा.दिपरत्न तायडे सर (सिद्धेश इलेक्ट्रोमेक कंपनी संचालक),मा.डाॅ.अ.फ. भालेराव सर,मा.डाॅ.शिवाजी चौधरी सर (वात्सल्य रुग्णालय मूक्ताईनगर),मा.हकिमदादा चौधरी (जिल्हाध्यक्ष मुस्लिम मणियार बिरादरी), उत्तमराव सुरवाडे (बौध्दाचार्य ओझरखेडा),मा.चेतनभाऊ झनके,विशालभाऊ झनके, दादासाहेब एन.जी.शेजोळे साहेब (सेवानिवृत्त बॅंक मॅनेजर,जेडीसीसी,ऊचंदे,मा.जोहरे साहेब,खिर्डी,मा.श्रिराम पोहेकर साहेब (माजी पोलिस उप निरीक्षक),मा.भागवत विठ्ठल पाटील साहेब (माजी सरपंच नायगांव,मा.अशोक निकम सर (सामाजिक कार्यकर्ते,चिंचखेडा),मा.मोहनजी मेढे साहेब (पत्रकार लोकशाही), नितिन बोदडे (पब्लिक इंटरनॅशनल स्कुल, भुसावळ),मा.राजेंद्र अटकाळे साहेब (अध्यक्ष, फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय संस्था रावेर),मा.संघरत्न दामोदरे साहेब (केंद्रीय शिक्षक, रावेर),मा.युवराज नरवाडे सर (मुख्य मेजर समता सैनिक दल, जिल्हा जळगांव),मा.सुरेश जोहरे साहेब (समता सैनिक दल, भुसावळ),मा.बि.डी.गव ई साहेब,मा.लोखंडे साहेब (राष्ट्रीय चर्मकार संघ, मुक्ताईनगर),मा.मनोहर बाविस्कर सर,ऊल्हासनगर,मा.चित्ततोष सावखेडकर साहेब,दिल्ली,मा.गणेश काकडे सर (प्रोटाॅन राज्य उपाध्यक्ष),मा.आनंद जाधव सर (राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ खांदेश प्रभारी),मा.राजेंद्र बावस्कर सर (राष्ट्रीय गुरु संत रविदास क्रांती संघ),मा.आर.बी.परदेशी सर(जळगांव जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन पेंशनर्स संघ),मा.मनोज वानखेडे सर (सामाजिक कार्यकर्ते, वरणगांव),मा.राजु वानखेडे सर (विधानसभा प्रभारी, बहुजन मुक्ती पार्टी, मुक्ताईनगर),मा.सिद्धार्थभाऊ हिरोळे (तालुकाध्यक्ष बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क, मुक्ताईनगर),मा.प्रमोद सौंदळे (राज्य संघठक, बहुजन मुक्ती पार्टी),मा.प्रमोद पोहेकर (महाराष्ट्र ग्रामीण उद्योजकता केंद्र, मुक्ताईनगर),मा.चंद्रमणी इंगळे सर (पत्रकार, मूक्ताईनगर),मा.जनार्दन बोदडे सर (बौध्दाचार्य चांगदेव),मा.महेंद्र लोंढे सर (तालुकाध्यक्ष,बामसेफ, रावेर),मा.सदाशिवजी निकम (निळे निशाण, रावेर),दिपकभाऊ इंगळे (अध्यक्ष,भिमस्टार फाऊंडेशन,ऊचंदे),मा.विद्याताई बोदडे (खडका),मा.सौ.जयश्री गाढे (पवननगर), उत्तम प्रधान (प्रतिभा फायर सर्व्हीस, नायगांव),मा.ईश्वर पोहेकर (समता सैनिक दल,नायगांव),मा.सतिष म्हसाने ,केर्हाळे,मा.प्रसेनजित तायडे,आंदलवाडी व इतर सर्व मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचलन मा.दिपकभाऊ इंगळे यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.सारिपुत्र गाढे (अध्यक्ष, प्रव्रज्या फाऊंडेशन नायगांव) यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.नितिन गाढे (सचिव, प्रव्रज्या फाऊंडेशन नायगांव) यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रव्रज्या फाऊंडेशन नायगांव द्वारे सारिपुत्र गाढे व नितिन गाढे यांनी केले होते.