ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे शासनाने प्रत्येक घरात पाणी पोहचले पाहिजे या अनुषंगाने जल जिवन मिशन ही योजना मंजूर करून या योजने मार्फत पाण्याची टाकी बांधकाम सुरू केलेले आहे एक वर्ष झाले जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकीचे काम सुरु केले होते परंतु नंतर हे काम अचानक बंद करण्यात आले काम बंद का पडले या मुळे ऐनपुर येथील नागरीक संभ्रमात पडले आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम एक वर्ष झाले सुरू झाले होते जमिनीच्या वर काम आले असून तेव्हापासून हे काम अचानक पणे आता बंद आहे जल जीव मिशन ही योजना भारत सरकारची मुख्य योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येक गावात प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देणे असे आहे या संकल्पनेतुन 2024 पर्यत गावा गावात ही योजना पुर्ण राबवायची आहे. [ads id="ads2"]
परंतु ऐनपुर येथे सुरु झालेले काम वर्ष भरापासून बंद करण्यात आले आहे हे काम केव्हा सुरु होईल यांची गावातील नागरीक मोठ्या अतुरतेने वाट पाहत आहे परंतु राजकीय हेवेदावे मुळे हे काम बंद पडले आहे का? ऐनपुर येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपले प्रतिनिधी पाठवले आहे ग्रामपंचायत चे सरपंच व सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे का? त्यांच्यातील हेवेदावे यामुळे तर काम बंद पाडले नाही ना ? किंवा ज्या कंत्राटदारांना हे काम देण्यात आले आहे त्यांच्या आर्थिक नियोजनामुळे तर काम बंद आहे असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत ठेकेदार व जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंता यांच्यात काही साटेलोटे तर नाही ना? असे गावांतील नागरीक चर्चा करीत असतांनाच दिसत आहे प्रत्येकाने गावातील राजकारण बाजूला ठेवून होत असलेल्या कामाला सहकार्य करावे यामुळे आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे बांधकामाची मुदत संपली असून प्रत्येकाला मुबलक व शुद्ध पाणी मिळावे या करता बंद पडलेले काम पुन्हा जोमाने सुरू करण्यात यावे व नागरीकाचा संभ्रम दूर करावा अशी अपेक्षा ऐनपुर येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
प्रतिक्रिया
जलजिवन मिशनच्या पाण्याच्या टाकीचे काम कंत्राटदारांनी बंद केले असून चौकशी करून कंत्राटदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून वाढीव मुदत देण्यात येईल लवकरच कामाला सुरुवात केली जाईल
रमेश वानखेडे
उप अभियंता जिल्हा परिषद जळगाव
२) जलजिवन मिशनच्या कंत्राटदार यांना वेळोवेळी काम सुरू करण्याबाबत बोलनं केले असून कंत्राटदार उडवाउडवीची उत्तरे देत आहे
अमोल महाजन
सरपंच ऐनपुर