मोठा वाघोदा ता.रावेर प्रतिनिधी (मुबारक तडवी)
मोठा वाघोदा तालुका रावेर येथे गेले आठ दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा व अती तापमानात गॅस्ट्रो सदृश आजाराची अनेक रुग्णांना लागण झाली होती एकीकडे ४६°पोहचलेले अती तापमान तसेच त्या दरम्यान ग्रामपंचायत ने केलेल्या गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. [ads id="ads1"]
दैनंदिन रुगणसंख्या व आरोग्य विभागाने जाहीर केलेली साथ यामुळे गॅस्ट्रोची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर खासगी दवाखान्यात, वाघोदा आरोग्य उपकेंद्र, निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, चिनावल येथे उपचार करण्यात आले. अखेर रुगणसंख्या शून्य झाली असून गॅस्ट्रो सदृश आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग यशस्वी झाले आहे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला आहे मात्र आता मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली आहे.[ads id="ads2"]
मोठे वाघोदेत गॅस्ट्रोची लागण होताच जि.प.सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रांत, तहसीलदार, बीडीओ आदी अधिकाऱ्यांनी भेटी देत उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता व शुद्ध पाणीपुरवठा.भर देत आहे गटारी, नाल्यांमध्ये असलेल्या जलवाहिन्या, नळ कनेक्शन उंचावर काढले जात आहेत सध्या हे काम आजही प्रगतीपथावर सुरू आहे. संक्रमित रुग्ण असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा केला. यामुळे आता गावातील साथ आटोक्यात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सन २०१७
मध्ये गावात हा प्रकार झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी, सीईओंनी या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी फैजपुर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे संबंधित प्रकरणी चौकशी सुरू आहे? तसेच दोषींवर काय कारवाई केली जाईल याकडे ही गाववासियांचे लक्ष लागून आहे? याप्रकरणी आरोग्य विभागाने ग्रा.पं.ला नोटीस बजावली आहे. त्याकडेही ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी मान्सूनपुर्व उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे डासांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होतांना दिसत आहे डेंग्यू मलेरिया सदृश ताप सर्दी खोकला आदिसारख्या आजाराची लक्षणे अनेकांना जाणवू लागले आहेत त्याकरिता आरोग्य विभाग ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे गावातील गटारीतील घाण गाळ काढून गावात मध्यभागी असलेल्या नाल्यातील गवतासह डास निर्मुलनासाठी औषध फवारणी तसेच धुरळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे साथरोग प्रसाराचे अगोदरच उपाययोजना केल्यास डेंग्यू मलेरिया विषाणू डासांची उत्पत्ती होणार नाही तसेच आजाराचे संक्रमणास प्रतिबंधीत करण्यास सोपे होईल म्हणून आरोग्य विभागासह वैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत प्रशासन यांनी साथरोग प्रसाराआधी च उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी मोठा वाघोदा वासिय नागरिक करीत आहेत तसेच मान्सूनच्या काळात साथीचे आजार पसरु नयेत यासाठी आरोग्य विभाग ग्रामपंचायत प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत. सध्या गेस्ट्रो सदृश आजाराची रुग्ण संख्या नियंत्रणात असून रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजय रिंढे यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यामुळे साथ आटोक्यात आणण्यात यश मिळाले.