यावल (सुरेश पाटील) येथील आठवडे बाजार दर शुक्रवारी भरत असतो आठवडे बाजाराच्या जागेवर दररोज आणि बाजाराच्या दिवशी म्हणजे दर शुक्रवारी नियमित आणि वेळेवर साफसफाई झाडू मारणे इत्यादी कामे होत नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह, शहरातील नागरिकांमध्ये भाजीपाला खरेदी करणाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असली तरी एखाद्या वेळेस साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे साफसफाई करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाकडे आणि यावल शहरातील ओला व सुका कचरा संकलन करण्याच्या कामाकडे यावल नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आणि एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन ठिकाणी आठवडे बाजार भरतो कसा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
आज दि.१७ मे २०२४ शुक्रवार रोजी यावल येथील आठवडे बाजार भरण्यास सुरुवात झाली असता सकाळी ९:३० ते १० वाजेच्या दरम्यान आठवडे बाजाराच्या मोकळ्या जागेवर यावल नगरपरिषदेच्या ठेकेदाराकडून साफसफाई आणि झाडू मारून कचरा उचलण्याचे काम झालेले नव्हते त्यामुळे भाजीपाला व इतर वस्तू विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.बाजार संपल्यानंतर इतर दिवशी या मोकळ्या जागेवर वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात अनेक कारणांनी घाणीचे साम्राज्य झालेले असते बाजाराच्या एक दिवस आधी आणि बाजाराच्या दिवशी संबंधित ठेकेदार आठवडे बाजाराच्या जागेची व्यवस्थितपणे साफसफाई, स्वच्छता करीत नसल्याने भाजीपाल्याच्या माध्यमातून यावल शहरात एखाद्या वेळेस साथीचा आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्याचप्रमाणे आठवडे बाजाराची जागा अपूर्ण पडत असल्याने शुक्रवारच्या दिवशी यावल शहरात मेन रोडवर म्हसोबा देवस्थान परिसरात भर रस्त्यात आठवडे बाजार भरत असतो म्हणजे एकाच दिवशी दोन ठिकाणी आठवडे बाजार भरत असल्याने एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन ठिकाणी आठवडे बाजार भरू देणारी, परवानगी देणारी जिल्ह्यातील यावल नगरपालिका एकमेव असेल असे सर्व स्तरात बोलले जात आहे.जिल्हाधिकारी जळगाव यांनी एकाच दिवशी २ ठिकाणी आठवडे बाजार भरण्याची परवानगी दिलेली आहे का..? शहरात २ ठिकाणी आठवडे बाजार भरत असल्याने एखाद्या वेळेस शहरात मोठी अप्रिय घटना घडल्यास याला जिल्हाधिकारी जळगाव,नगरपालिका यावल, महसूल विभाग,आणि पोलीस जबाबदार राहणार असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.त्याचप्रमाणे यावल येथील चोपडा रोडला लागून असलेल्या आठवडे बाजारातील बंद असलेले व्यापारी संकुलनाचे बांधकाम आणि झालेले अतिक्रमण काढून जागा मोकळी करावी आणि याबाबत नगरविकास विभागामार्फत अतिक्रमण काढण्याचे आदेश असताना जिल्हाधिकारी जळगाव तथा यावल नगरपरिषद यांनी अतिक्रमण न काढल्याने आदेशाची पायमल्ली केल्याने संबंधितांवर कारवाई केव्हा होणार..? असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे. [ads id="ads2"]
आठवडे बाजार जागेवर दररोज नियमितपणे साफसफाई झाडू मारणे,ओला सुका कचरा उचलणे इत्यादी कामे वेळेवर आणि नियमित करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या गेल्या पाहिजे अशी रास्त मागणी यावल शहरातून होत आहे.
यावल शहरात अनेक ठिकाणी यावल नगरपालिकेच्या व खाजगी मालकीच्या जागांवर साफसफाई स्वच्छता अभावी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.गटारी चोकअप झालेल्या आहेत.
भुसावल रोडला लागून विमल सिटी मधील भूमिगत गटारी चोकअप झाल्याने, भूमिगत गटारी म्हणजे संबंधित विकासाकाने कमी इंची व कमी व्यासाचे निकृष्ट प्रतीचे प्लास्टिक पाईप टाकले ते चोकअप झाले आहेत, नगरपालिकेची परवानगी न घेता सोयीनुसार भूमिगत गटारीच्या नावाखाली ठेकेदाराने नगरपालिका प्रशासनाची शुद्ध दिशाभूल करून आपला व्यावसायिक हेतू साध्य करून घेतला आहे. पर्यायी आता वापराचे घाण पाणी दुसऱ्या मोकळ्या प्लॉटच्या जागेवर साचत असल्याने विकसित भागातील रहिवासी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याचप्रमाणे बालाजी व गजानन सिटी मध्ये सुद्धा गटारी मातीने भरून नष्ट झालेल्या आहेत इत्यादी सह यावल शहरात ९० टक्के भागात गटारीतील पाणी वाहून जात नसल्याने गटारीतच घाण पाणी साचून राहत असल्याने रहिवाशांना दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे. यावल नगरपरिषदेने प्रत्यक्ष खात्री व चौकशी करून तात्काळ उपाययोजना करावी अशी सर्व चर्चा मागणी होत आहे.