मोठा वाघोद्यात सिईओंसह २५ अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा दाखल ; गॅस्ट्रो सदृश परिसराची पाहणी व केल्या सुचना


मोठा वाघोदा ता.रावेर प्रतिनिधी (मुबारक  तडवी)                    आज मोठा वाघोदा येथील गॅस्ट्रो सदृश आजाराचे संक्रमण झालेल्या प्रभाग व परिसरातील पाहणी जळगांव जिल्हा परिषद चे सिईओ मुख्यकार्यकारी अधिकारी श्री अंकित जिल्हा आरोग्य अधिकारी डिएचओ डॉ सचिन भायेकर उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फैजपुर देवयानी यादव तहसीलदार बंडू कापसे गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजय रिंढे यांच्या सह जिल्हाभरातील २५ अधिकारी कर्मचार्याचा भला मोठा ताफ्यात मोठा वाघोदा येथील गॅस्ट्रो संक्रमित रुग्ण आढळलेल्या परिसराची पाहणी केली.[ads id="ads1"]  

  व नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या व चिनावल येथील पीएचसी ला भेट देऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व आरोग्य विभागाचे अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांना आवश्यक ते उपचार करण्याचे सांगितले तसेच दैनंदिन रुग्ण संख्या वाढत असल्याने मोठा वाघोद्यात आरोग्य विभागाने गॅस्ट्रो ची साथ घोषित केली आहे दि २१ मे पासून उद्भवलेल्या गॅस्ट्रो सदृश आजाराचे रुग्ण आढळल्याचे आदल्या दिवशी म्हणजेच दि.२० मे रोजी चे घेतलेले पाणी तपासणी नमूने दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे तसेच सन २०१७ मध्ये ही त्याच प्रभाग परिसरात डायरियाची साथ पसरली होती आणि आताही उपरोक्त परिसरातील नागरिकांना गॅस्ट्रो सदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.[ads id="ads2"]  

  दूषित पाणी पुरवठा पाईप लाईन लिकेज मुळे दूषित पाणी पुरवठा केला गेल्यामुळे गॅस्ट्रो सदृश आजाराचे दि २१ रोजी २७ रुग्ण तर दि २२मे रोजी ११ रुग्ण आढळले होते तर आज दि २३ मे रोजी सकाळपासून १ वाजेपर्यंत ८ नवीन रुग्ण चिनावल पीएचसी ला दाखल झाले आहेत आणखी संख्येत वाढ होऊ शकते? आरोग्य विभागाने विविध भागातून पाणी तपासणी नमूने तपासले असता ४ते ५ पाणी नमुने त नमुद पाणी दूषित असल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी ग्रामपंचायत ला त्यासंबंधी ची नोटीस बजावली आहे तर गॅस्ट्रो सदृश परिसरात सध्या पाईप लाईन द्वारे पुरवठा बंद करून टॅकरद्वारे शुध्द पाणी पुरवठा करण्याचे आदेश जळगांव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिईओ डॉ अंकित यांनी मोठा वाघोदा येथील संक्रमित भागात पाहणी करते वेळी दिले तसेच संबंधित परिसरातच हा प्रकार दुसरे वेळी घडली असल्याने सदर प्रकाराची समिती गठीत केली जाऊन सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले यावेळी परिसरातील नागरिकांनी नवीन पाईप लाईन, नवीन गटारी आदी समस्यांचे जिल्हा परिषद चे सिईओ डॉ अंकित यांचेसमोर मांडले तत्पूर्वी त्यांनी सध्या गॅस्ट्रो ची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील ज्यांना लक्षणे जाणवत असतील त्यांनी तात्काळ आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल व्हावे आणि आरोग्य यंत्रणेने ही रुग्णांना उपचार पद्धती आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे कामी सुचना दिल्या.

सध्या तापमानात खूप वाढ झाली आहे उष्माघात ही टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर निघू नये उष्माघात होण्याची शक्यता असते यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आली आहेत - सिईओ डॉ. अंकित

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️