मोठे वाघोदे प्रतिनिधी/मुबारक तडवी
मोठा वाघोदा येथे आज दिनांक ३० मे रोजी जळगांव चे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जळगांव जिल्हा परिषदेच्या सिईओ मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अंकित यांनी केल्या मार्गदर्शक सूचना डिएचओ डॉ सचिन भायेकर रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजय रिंढे यांनी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी याचेसोबत केली.[ads id="ads1"]
परिसरातील शुध्द पाणी पुरवठ्याची ओटीए पाणी नमुने ओंकार एस बाबत माहिती दिली तपासणी आज दि ३० मे रोजी मोठा वाघोदा आरोग्य उपकेंद्र येथे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जिल्हा परिषद सिईओं डीऐचओ वैद्यकीय अधिकारी कर्मचार्याचा ताफा दाखल होऊन जळगांव जिल्हाधिकारी जिल्हा परिषद चे सिईओ डॉ अंकित यांनी मोठा वाघोद्यातील आरोग्य उपकेंद्रात आढावा बैठक घेतली तसेच पावसाळ्यात मान्सून पुर्व तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.[ads id="ads2"]
तसेच आरोग्य यंत्रणा गावात घरोघरी जाऊन पाण्याची ओटीए पाणी तपासणी करून नागरिकांना मार्गदर्शक सूचना करीत आहेत यात प्रामुख्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर डॉ अजय रिंढे चिनावल निंभोरा पीएचसी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आशा सेविकांचा समावेश आहे
मोठा वाघोदा येथे गॅस्ट्रो आजाराची लागण झालेल्या परिसरात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली जिल्हा परिषदचे सर्व आरोग्य वैद्यकीय विभाग प्रमुख आरोग्य यंत्रणा यांनी आज ३० मे रोजी मोठा वाघोदा येथील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण पुरवठा पाहणी व तपासणी केली, पाणी पुरवठा पाइपलाइन दुरुस्ती , आरोग्य विभाग कर्मचारी समवेत संक्रमित भागात घरोघरी जाऊन रुग्णांबाबत चौकशी विचारपूस केली.रुग्णांना ओआरएसबद्दल माहिती देण्यात आले. तसेच हात धुणे, ओआरएस तयार करणे बाबत प्रात्यक्षिके करून दाखवले तसेच घराशेजारी परिसर स्वच्छता ठेवण्याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले. मागील चार दिवसापासून एकही नवीन रुग्ण या गावांमध्ये आढळून आलेला नाही साथ आटोक्यात आली आहे तरी सर्व आरोग्य यंत्रणा यांना योग्य त्या सूचना देऊन यत्रणा कार्यरत ठेवण्यात आलेली आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये औषधी साठा मुबलक उपलब्ध करण्यात आलेला आहे तसेच पावसाळ्यात मान्सून पुर्व तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या
मोठा वाघोदा ग्रामपंचायत प्रशासनाने गॅस्ट्रो बाधीत परिसरात नविन १४०० फुट पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे गॅस्ट्रो सदृश आजाराची साथ आटोक्यात आली आहे तरी संक्रमित भागात टॅकरने क्लोरीनेशन करुन पाणी पुरवठा करण्यास प्राधान्य दिले जात आहे गावातील मध्यभागातून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील गवतावर तणनाशक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे गावातील घन कचरा घाण उचलून वाहून नेण्यासाठी मोठा वाघोदा शेजारच्या गावातील ग्रामपंचायत चे विवरा वडगांव निंभोरा चिनावल उटखेडा कुंभारखेडा सावखेडा या गावाचे कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर सह बोलवून साफसफाई करण्यात येत आहे गावातील सार्वजनिक शौचालय सावदा फैजपुर रावेर येथील नगरपालिका कर्मचारी व्हॅक्यूम टॅक द्वारे खाली करून साफसफाई करण्यात येत आहे शुध्द पाणी पुरवठा साफसफाई वर भर दिला जात आहे ग्रामविकास अधिकारी सुनील गोसावी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन मोठा वाघोद्यात ठाण मांडून शुध्द पाणी पुरवठा साफसफाई गवताच्या फवारणी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत तसेच आरोग्य यंत्रणा गावात घरोघरी जाऊन पाण्याची ओटीए पाणी तपासणी करून नागरिकांना मार्गदर्शक सूचना करीत आहेत यात प्रामुख्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर डॉ अजय रिंढे चिनावल निंभोरा पीएचसी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आशा सेविकांचा समावेश आहे