ग्रामपंचायत विवरे खुर्द च्या उपसरपंच पदी नसीम बी शेख शरीफ यांची बिनविरोध निवड


विवरे खु  ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 27 सोमवार रोजी ग्रामपंचायत विवरे खुर्द च्या उपसरपंच पदी नसीम बी शेख शरीफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याआधी उपसरपंचपदी दीपक जगन्नाथ गाढे हे अनुसूचित जातीचे इसवी सन 1954 पासूनचे पहिले उपसरपंच व प्रभारी सरपंच पदाचा मान मिळाला होता. [ads id="ads1"]  

  दीपक गाढे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा देऊन रिक्त झालेल्या पदावर नसीम बी शेख शरीफ पहिल्या अल्पसंख्यांक महिला उपसरपंच झाल्या. हि निवड सरपंच सौ. स्वरा संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येऊन नवनियुक्त उपसरपंच नसीम बी शेख शरीफ यांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या. [ads id="ads2"]  

 यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, दीपक गाढे ,सुभाष पाटील,मंगला बखाल,सुनील पाटील, ग्राम विकास अधिकारी अतुल पाटील, माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर सुभाष पाटील,मेहमूद शेठ ,रफिक शेठ,राजेंद्र चौधरी, घनश्याम  बखाल, भागवत महाजन, विकास पाटील, भास्कर गाढे,ज्ञानेश्वर विचवे, उस्मान शेख,सुरेश कोळी, रघुनाथ पटवारी, गफार सत्तार, निसार सर, सतीश पाटील इत्यादी ग्रामस्थ व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️