केळी पिकाला भाव मिळत नसल्याने रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सोमवारी दि. ६ मे रोजी पहाटे रावेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने केळी पिकाला भाव मिळत नाही म्हणून झाडाला फाशी घेत स्वतःचे जीवन संपवले. अतिशय विदारक अशी ही घटना रावेर तालुक्यातील निंभोरा येथे उघडकीस आली आहे. [ads id="ads1"]  

हर्षल रवींद्र नेहते (वय ३८, रा. निंभोरा ता. रावेर) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. निंभोरा गावात तो त्याच्या परिवारासह राहत होता. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, रावेर तालुक्यातील केळी पट्ट्यामध्ये केळीला भाव मिळत नसल्यामुळे बहुसंख्य शेतकरी हे चिंताग्रस्त झाले आहेत. त्यातच हर्षल देखील केळीला भाव नसल्यामुळे चिंताक्रांत झालेला होता.[ads id="ads2"]  

सोमवारी दि. ६ मे रोजी पहाटे त्याने स्वतःच्या शेतात विहिरीजवळील रामफळाच्या झाडाला दोरीचा गळफास लावून आत्महत्या केली. ग्रामस्थांना घटना समजताच त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. हर्षलच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️