यावल ( सुरेश पाटील )
आज रावेर मतदार संघातील अटवाडे, दोधे तालुका रावेर परिसरात काल रविवार दिनांक २६ रोजी वादळी पावसामुळे केळी पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी डॉक्टर फेगडे यांनी करून शेतकऱ्यांना धीर दिला. [ads id="ads1"]
या वादळी पावसानत केळी पिक जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.संपूर्ण नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकारी वर्गाला तत्काळ पंचनामे करून खर्च व उत्पादनाचा आढावा लक्षात घेता शेतकऱ्यांना टक्केवारी योग्य प्रमाणात देण्याबाबत विनंती केली.यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी डॉ.फेगडे यांना शेतातील पिके दाखवून विदारक परिस्थितीचे कथन केले.यावेळी शेतकरी बांधवांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी धीर देण्यात आला.[ads id="ads2"]
दोधे येथील जनार्दन पाटील,सुनील पाटील, गोपाळ पाटील,भुषण महाजन, योगेश पाटील,तसेच आटवाडे येथील,रावेर कु उ बा स सदस्य जयेश कुयटे, सरपंच किरण कोळी, सदस्य भगवान धनगर,गणेश धनगर,गोपाळ महाजन,एकनाथ पाटील, सुनील महाजन,हितेश पाटील, शेतकरी अलोककुमार गर्ग, संतोष पाटील इ उपस्थित होते.