सोलापूर - दि. २७ मे २०२४ रात्री १०:३० वाजता,सोलापुरातील विजापूर रोड येथील पत्रकार भवन जवळ सर्प आढळून आल्याची माहिती नेहरू नगर येथील राहणार पियुष पवार यांनी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना फोन कॉल द्वारे दिली. दरम्यान सर्पमित्र भीमसेन लोकरे हे बाहेर गावी असल्याने निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष सर्पमित्र रविचंद्र स्वामी व सर्पमित्र अक्षय रजपूत यांना घटनास्थळी पाठवणीन्यात आले.[ads id="ads1"]
सर्पमित्र रविचंद्र स्वामी व अक्षय राजपूत हे अवघ्या ५ मिनिटात त्या ठिकाणी पोहचले असता तेथील रहिवासी लिंगराज गुंडेल्लू हा मद्यधुंद अवस्थेत स्वतःच त्या सापाला पकडले व त्या सापास कंबर तलावात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना यांना सांगितली.
सर्पमित्र स्वामी यांनी तो सर्प कोणता आहे अशी विचारणा केली असता...सापाला पकडणारा लिंगराज गुंडेल्लू हा , साप कोणता आहे हे मला माहित नाही, मी असे हजारो साप पकडून कंबर तलावात सोडले आहे आणि हा साप पण सोडणार असे म्हणत सर्पमित्रांस पाचरण न करता अरेरावीची भाषा वापरून तेथून निघून गेला. सापाची ओळख नसताना सुद्धा मद्यधुंद अवस्थेत सापास पकडणारे कारामती पाहून सर्पमित्र रवी स्वामी हे थक्कच झाले. व तेथून निघून गेले. [ads id="ads2"]
"सोलापूर जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढत असताना" अशा कृत्याने आणखी धोका होऊ शकतो व त्याच बरोबर स्वयंमघोषित सापपकडणाऱ्यांमुळे निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सर्पमित्रांचे नाव खराब होतात. वन विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व अशा प्रकाराला आळा घालावा.
सर्पमित्र भीमसेन लोकरे
संस्थापक - निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटना