मधुकर साखर कारखाना सभासद शेतकरी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार..?



यावल  ( सुरेश पाटील ) तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याकडील ऊस बिलाची थकबाकी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबतचे निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील हरसोडा येथील रवींद्र प्रभाकर रायपुरे भीमराव वासुदेव झाल्टे व इतर सर्व शेतकरी सभासदांनी मधुकर सहकारी साखर कारखाना,फैजपूर पोलीस, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते आणि आहे या निवेदनाची दखल मधुकर सहकारी साखर कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था जळगाव यांनी घेतली आहे.[ads id="ads1"]  

         मधुकर सहकारी साखर कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव विजयसिंह गवळी यांनी दि.७ मे २०२४ रोजी मलकापूर तालुक्यातील निवेदन करताना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की

आपण दिलेल्या निवेदनानुसार नुसार आपण व इतर शेतकरी मिळुन मधुकर सहकारी कारखान्याकडील उस बिलाची थकबाकी न मिळाल्याने येत्या लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकणेबाबतचे निवेदन प्राप्त झालेले आहे.[ads id="ads2"]  

         विषयाबाबत आपणास खालील प्रमाणे अवगत करण्यात येत आहे.

१) मा.उच्च न्यायालय,मुंबई खंडपिठ औरंगाबाद यांचे कडील याचिका क्र.७१७६

/२०१९ मधील निर्णया प्रमाणे

प्रादेशिक सहसंचालक ( साखर ) छत्रपती संभाजीनगर यांनी दि.२४ एप्रिल २०२४ च्या आदेशाप्रमाणे रक्कम वाटप

करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यांचे निर्देशाप्रमाणे कारखान्याचे बँक खात्यावर दिनांक ०४/०५/२०२४ रोजी रक्कम प्राप्त झालेली आहे.

२) उपरोक्त याचिकेतील निर्णया प्रमाणे कारखानास्तरावर एफ.आर.पी.शी संबंधित शेतकऱ्यांचे मागणी अर्ज व

त्यासोबत बँक खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड ई. तपशील मागविण्यात आलेला होता,उपरोक्त सर्व मागणी अर्ज

प्रादेशिक सहसंचालक (साखर) छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले होते.त्यांचे

कार्यालयाकडून उपरोक्त सर्व अर्ज विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (साखर) जळगांव यांचे कार्यालयाकडे तपासणी कामी

वर्ग करण्यात आलेले होते. प्रादेशिक सहसंचालक (साखर) छत्रपती संभाजीनगर यांचे दि.२४ एप्रिल २०२४ चे निर्देशानंतर सदरचे अर्ज कारखान्याकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. उपरोक्त अर्ज वर्ग झाल्यानंतर सर्व संबंधित शेतकऱ्यांची माहिती आर. आर. सी. प्रमाणे त्यांचे बँक खाते क्रमांक व इतर तपशिल भरण्याचे कामकाज लेखापरीक्षण विभागाकडील कर्मचारी यांचे मदतीने चालु आहे.सद्यस्थितीत लोकसभा निवडणूक २०२४ चालु असल्याने सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवा निवडणूक कामासाठी वर्ग झालेल्या आहेत,त्यामुळे उपरोक्त

तपशिल भरणेकामी अवधी लागणार आहे.उपरोक्त सर्व तपशिल भरुन झाल्यानंतर बँकेमार्फत आर.टी.जी.एस. द्वारे संबंधित शेतकऱ्यांचे बँक खात्यावर एफ.आर.पी. ची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही

शेतकऱ्यास कारखाना स्थळावर अथवा कोणासही वैयक्तिक भेटण्याची आवश्यकता नाही.

३) काही शेतकऱ्यांकडे उस बेणी व खताच्या रकमा कारखान्यास येणे आहेत. कारखान्याचे सर्व रेकॉर्ड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगांव यांनी Securitizatiom Act अन्वये ताब्यात घेतलेले आहे. बँकेने त्यांचे कर्जापोटी कारखाना व काही मालमत्ता विक्री करुन त्यांचे कर्ज भरुन घेतलेले आहे.परंतु अद्यापपर्यंत कारखान्याचे रेकॉर्ड प्राधिकृत

अधिकाऱ्यांचे ताब्यात दिलेले नाहीत.त्यामुळे येणे बाकीची खात्री करता येत नाही.ते केल्याशिवाय सदरच्या रकमा

वाटप करण्यामध्ये अडचणी येत आहेत.कारखान्याचे रेकॉर्ड ताब्यात मिळाल्यानंतर व लोकसभा निवडणूक २०२४

झाल्यानंतर उपरोक्त रकमा वाटणेबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.

४) लोकसभा निवडणूक २०२४ कामी माझी स्वतःची होम वोटींग व पोस्टल बॅलेट वोटींगसाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली असल्याने त्या कामाच्या व्यग्रतेमुळे या कामकावर परिणाम होत आहे.

उपरोक्त प्रमाणे वस्तुस्थिती असल्याने मी आपणास आश्वस्त करु इच्छितो की, उपरोक्त प्रमाणे कामकाज पुर्ण झाल्यानंतर आर.आर.सी.तील यादी प्रमाणे सर्व शेतकऱ्यांचे बँक खात्यावर एफ.आर.पी. ची रक्कम जमा होणार आहे.या प्रक्रीयेसाठी काही अवधी लागणार आहे.सबब आपणास विनंती की,आपण लोकसभा निवडणूक २०२४ वर बहिष्कार न टाकता,नागरीक म्हणुन आपला मतदानाचा हक्क बजावण्यात यावा व उपोषणासारखा पर्यायांचा अवलंब करु नये. असे मधुकर कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी विजयसिंह गवळी यांनी निवेदन करताना दिले असले तरी संबंधित शेतकरी तथा कारखाना सभासद लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार किंवा मतदान करतील किंवा नाही याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे याचप्रमाणे मधुकर कारखान्याचे जिल्ह्यातील इतर सभासद शेतकऱ्यांनी निर्णय घेतल्यास लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम पडल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघात बोलले जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️