रेंभोटा (ता. रावेर) : जि.प. बांधकाम विभाग रावेर ला 31/01/2024 रोजी अर्ज देऊन सुद्धा संबंधित अधिकारी गेली 4 महिने उलटून सुद्धा कुठलीही कार्यवाही करण्यात का आली नाही.या उलट त्यांना विचारांना केली असता संबंधित अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.[ads id="ads1"]
रस्त्यादरम्यान ठिकठिकाणी काटेरी झुडपे वाढली असून ती रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघांत होण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकत नाही.त्यामुळे काटेरी झुडपे काढावीत अशी मागणी रेंभोटा येथील ग्रा.पं.सदस्य प्रशांत दिलीप गाढे यांनी जि.प.बांधकाम विभागाकडे केली आहे.[ads id="ads2"]
रेंभोटा फाटा- रेंभोटा वरून ऐनपुर येथे शिक्षण घेण्यासाठी गावातून जाण्यासाठी रेंभोटा फाटा पर्यंत जाण्यासाठी या रस्त्याने पायी जावे लागते .त्यामुळे
कायम या रस्त्यावरून वाहतूक चालू असते. मात्र रस्त्याच्या नजीक ठिकठिकाणी काटेरी झाडे वाढली आहेत.
रस्त्याने 2 ते 3 ठिकाणी वडणी असल्यामुळे येणाऱ्या जाणारी व्यक्ती दिसत नाही.त्यामुळे अपघात झाल्यास याची जबाबदार कोण ? असा प्रश्न लोकांचा मनात उपस्थित होतो तरी संबंधित विभागाने वाढलेली काटेरी झाडेझुडपे काढावी अशी मागणी ग्रा.पं.सदस्य प्रशांत दिलीप गाढे यांनी जि.प.बांधकाम विभागा रावेर कडे मागणी केली आहे.
प्रतिक्रिया
संबधीत जि.प. बांधकाम विभाग रावेर ला गेल्या 4 महिन्या पासून पत्र व्यवहार व प्रत्यक्ष भेटून सुद्धा आता पर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.रेंभोटा फाटा- रेंभोटा कुठलाही अपघात अथवा जीवित हनी झाल्यास संबंधित अधिकारी व विभाग हेच त्या अपघाताला जबाबदार राहतील.संबंधित विभागाने जर रेंभोटा फाटा- रेंभोटा रस्त्याने झुडपे लवकर लवकर न तोडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.होणाऱ्या परिणामास जि.प.बांधकाम विभाग जबाबदार राहिल.
प्रशांत दिलीप गाढे
ग्रा. पं.सदस्य रेंभोटा