महिला तलाठ्याने वीटभट्टी चालकाकडून २५ हजाराची लाच घेतल्याचे मान्य केल्याने गुन्हा दाखल ; धुळे लाच लूचपत विभागाची कारवाई

 


यावल  ( सुरेश पाटील ) वीट भट्टी चालकाकडून महिला तलाठी श्रीमती वर्षा रमेश काकुस्ते यांनी २५ हजार रुपयाची लाच घेतल्याचे मान्य केल्याने नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार, धुळे येथील लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांनी कारवाई करून पाचोरा पोलीस स्टेशनला आज शुक्रवार दि.२४ मे २०२४ रोजी महिला असलेल्या तलाठी वर्षा काकुस्ते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.यामुळे जळगाव जिल्ह्यात संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली.[ads id="ads1"]  

          याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे दिगर,येथील रहिवासी तक्रारदार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असुन त्यांचा विट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतुक करण्याकरीता त्यांनी श्रीमती वर्षा काकुस्ते, तलाठी मौजे शिवरे दिगर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्या करीता २५,००० /- रू जमा करून घेतले.त्यानंतर तक्रारदार यांनी गौण खनिज परवान्याची चौकशी करण्याकरीता तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली असता,त्यांनी तक्रारदार यांचेकडे यापुर्वी दिलेल्या पैशांची पावती न देता त्या व्यतिरिक्त २५,०००/- रु लाचेची मागणी केल्याची ला.प्र.विभाग,धुळे कार्यालयात दि.१२ डिसेंबर २०२३रोजी तक्रार दिली होती.[ads id="ads2"]  

सदर तक्रारीची दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी पडताळणी केली असता,पडताळणी दरम्यान वर्षा काकुस्ते,तलाठी शिवरे दिगर यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याचदिवशी पुन्हा त्याचे पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले म्हणुन त्यांचे विरुध्द पारोळा पो.स्टे.जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम,मुकेश अहिरे,प्रशांत बागुल,संतोष पावरा,रामदास बारेला,मकरंद पाटील,प्रविण मोरे,प्रविण पाटील,सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️