आरोग्य विभागाचे अथक परिश्रम तर ग्रामपंचायत प्रशासनाचा स्वच्छ पाणी साफसफाई वर भर .मात्र साथ जाहीर असून ७ दिवस वैद्यकीय पथक राहणार लक्ष देत ठाण मांडून
मोठा वाघोदा प्रतिनिधी (मुबारक तडवी) मोठा वाघोदा येथे दूषित पाणी पुरवठा व उच्च तापमानाने ३६ रुग्णांना अतिसार उलटी मळमळ चा त्रास होऊ लागल्याने काही रुग्णांनी खाजगी दवाखान्यात तर उर्वरित संक्रमित रुग्ण यांना प्रथम रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा आरोग्य उपकेंद्र निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्र , चिनावल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते जिल्हा आरोग्य अधिकारी डिएचओ डॉ सचिन भायेकर रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजय रिंढे तहसीलदार बंडू कापसे बिडीओ सौ. दिपाली कोतवाल उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फैजपुर देवयानी यादव जळगांव जिल्हा परिषद चे सिईओ मुख्यकार्यकारी डॉ अंकित याचेसह संबंधित विभागाच्या २५ अधिकार्यानी मोठा वाघोद्यात गॅस्ट्रो सदृश आजाराचे रुग्ण आढळलेल्या परिसराची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सुचना दिल्या.[ads id="ads1"]
तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगांव येथे खाजगी दवाखान्यात आयसीयुत भरती असलेले रुग्णांची भेट देऊन पाहणी केली होती तसेच सदर साथरोग प्रसाराचे प्रकार २०१७ मध्ये ही घडले होते त्याच परिसरातच पुन्हा ही पुनरावृत्ती झाली असल्याचे सिईओ डॉ अंकित जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपजिल्हाधिकारी तथा फैजपुर उपविभागीय अधिकारी यांचे सह अधिकारी ची चौकशी समिती नेमली व दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत व दोषींवर कारवाई करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले आहे याच धर्तीवर आरोग्य विभागाने मोठा वाघोदा ग्रामपंचायत ला तशी नोटिस बजावली आहे यावर नियुक्त चौकशी समिती काय चौकशी करेल? कोणावर दोषारोप सिध्द करणार? का चौकशी कागदोपत्री होणार?का खरंच कारवाई होणार?का दोषींना पाठीशी घालणार??याकडे गॅस्ट्रो पीडीतासह मोठा वाघोदा वासिय नजरा लागून आहेत ग्रामपंचायत प्रशासन मोठा वाघोदा दोन दिवसांपासून संक्रमित परिसरात पाईप लाईन चा दूषित पाणी पुरवठा बंद करून टॅकरद्वारे शुध्द पाणी पुरवठा करीत आहे दि २१,२२,२३,२४,मे रोजी पर्यंत रुग्ण संख्या वाढत गेली दरम्यान दि २० मे रोजी चा पाणी तपासणी नमूना अहवाल पाणी दूषित असल्याचे प्राप्त झाले होते.[ads id="ads2"]
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्ण संख्येने शंभरी पार केली असल्याचे सांगितले? वरिष्ठ अधिकारी यांची भेट पाहणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सुचना आरोग्य विभागाचेअथक परिश्रम अचूक उपचार पद्धती भलंमोठं वैद्यकीय यंत्रणा रात्रंदिवस मेहनत घेतली तसेच ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी प्रभारी पदभार असुनही ५ दिवस गावात ठाण मांडून राहत गावास प्राप्त होणारे ६ कि मी बलवाडी येथून येणारे पाईप लाईन ने पाणी ते जलकुंभातून ते वार्ड वस्तीतील सर्व पाणी पुरवठा पाईप लाईन शोधून काढत अद्यापही लिकेज शोधून जोडण्याचे काम सुरू आहे व आणखी आठ दिवस सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पुर्वी डायरिया व आता गॅस्ट्रो सदृश आजारा प्रसार झालेल्या पुर्ण परिसरातील पाईप लाईन खोदून काढून नवीन पाईप लाईन टाकण्यात येणार असल्याचे ही म्हणाले तसेच बसस्थानक परिसरात असलेला १९७० वर्षीचा बांधलेला जीर्ण जलकुभ कधीही घसरुन पडेल तत्पूर्वी च तो ४,५दिवसांत पाडण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी मोठा वाघोदा ग्रामपंचायत प्रशासन यांच्या अथक परिश्रम मेहनती मुळे गॅस्ट्रो सदृश आजाराची लक्षणे लागण असलेल्या रुग्णांना अचूक उपचार पद्धतीने निदान होते दोन दिवसांपासून रुग्ण संख्या कमी होत आहे आज दि २५ मे रोजी चिनावल येथील पीएचसी मध्ये ६ रुग्ण उपचार घेत आहेत तर २२रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला गॅस्ट्रो सदृश आजाराचे रुग्ण उपचार व रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी स्वतः रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजय रिंढे आपल्या सहकाऱ्यांसह लक्ष ठेवून आहेत रुग्ण संख्या ही नियंत्रणात आली आहे.