अपघातग्रस्त महिलेला स्वतःच्या कारमधे हॉस्पिटलला नेऊन वाचविले प्राण : डॉ.कुंदन फेगडे यांची तत्परता आणि वैद्यकीय मदत

 


यावल (सुरेश पाटील) शनिवार दि.२५ मे २०२४ रोजी दुपारी अंकलेश्वर–बऱ्हाणुपर राष्ट्रीय मार्गावर सावदा येथून बऱ्हाणपूरकडे जात असतांना प्रवासी वाहतूक करणारी एक ॲपेरिक्षा रस्त्यात अचानक पलटी झाला हा अपघात  वडगाव रस्त्यावर झाला.या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असता महिले सोबत एक २ वर्षीय बाळ व एक ७ वर्षीय मुलगी होती, योगायोगाने यावेळी याच या मार्गावरून यावल येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे आपल्या कामानिमित्त जात होते अपघात झाल्याचे त्यांना दिसल्याबरोबर त्यांनी आपले वाहन थांबवून आपल्या स्वतःच्या वाहनांमध्ये त्या जखमी महिलेस तात्काळ बसवून रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून ( शासकीय वैद्यकीय सेवेचा अनुभव असल्याने ) त्यांनी स्वतःच त्या महिलेवर उपचार सुरू केले व माणुसकी दाखवीत जखमी महिलेचे प्राण वाचवले अपघात झाल्या नंतर ॲपेरिक्षा चालक हा मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे.[ads id="ads1"]  

    अंकलेश्वर - बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सावदा येथून प्रवासी घेऊन एक अज्ञात ॲपेरिक्षा चालक ॲपेरिक्षा क्रमांक एम. एच.१९ बी.जे. ५२८५ घेऊन बऱ्हाणपूरकडे जात होता. दरम्यान वडगाव ते विवरे या रस्त्यावर रिक्षा अनियंत्रित झाली व रस्त्यावर कलंडली या अपघातात दिपाली पांडव रा.बऱ्हाणपूर ही महिला गंभीर जखमी झाली व इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली.[ads id="ads2"]  

  अपघात झाल्यानंतर याच मार्गावरून यावल येथील आशय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे हे जात होते त्यांनी स्वतःचे वाहन थांबवले यांनी जखमींना त्यांच्या वाहनात बसवले व तेथून रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.ही सामाजिक सेवा आणि समय सूचकता दाखवीत अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत करून अपघातग्रस्त महिलेचे प्राण वाचविल्याबाबत डॉ.कुंदन फेगडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️