अश्विनी कोष्टा अपघातास कारणीभूत मद्यधुंद वाहन चालकासह पित्यावर कारवाईची महाराष्ट्र कोष्टी समाजाची मागणी



यावल  ( सुरेश पाटील )

मद्यधूंद अवस्थेत अति वेगात गाडी चालवून कोष्टी समाजातील पुणे येथे नौकरी करणाऱ्या युवतीसह दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन धनधानग्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अरोपीच्या मालमत्तेतील २५ टक्के स्थावर मालमत्ता मयताच्या वारसांना द्यावी अशी मागणी समस्त कोष्टी समाज संघटनेच्यातर्फे पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली आहे. [ads id="ads1"]  

      अधिक माहिती की,रविवार दि.१९ मे २०२४ च्या मध्यरात्री कल्याणीनगर पुणे परिसरात एक भीषण अपघात धनधानग्या परिवारातील,मद्य धुंद अल्पवयीन मुलाच्या हातून झाला.यामध्ये कोष्टी समाजातील पुणे येथे नौकरी करणारी युवती कु.आश्विनी कोष्टा व एका युवकाचा मोटार सायकलवर जात असताना जागीच ठार झाले,अपघाताने दोघांचे बळी घेतले.या घटनेचा समस्त कोष्टी समाजाच्यावतीने तिव्र निषेध करत मागण्यांचे लेखी निवेदन पुणे पोलिस आयुक्त आमितेशकमार यांच्या मार्फत शासनाला दिले . [ads id="ads2"]  

      निवेदनात नमुद केले की , कोष्टी समाजातील जबलपुर येथील पुणे येथे नोकरी करणारी युवती अश्विनी कोष्टा व तिच्या मित्राचा एका धनधानग्या कुटूबातील अल्पवयीन युवकांने मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवून हकनाक बळी घेतला,फारच दुःखद ही घटना घडली. ही दुःखद बातमी जेव्हा मिडिया द्वारे पूर्ण भारतात प्रसिध्द झाली,तेव्हा पुर्ण देशातील कोष्टी,कोष्टा समाजात दुःखाची लहर पसरली,समाज आक्रोशीत झाला,अश्र्विनीला न्याय मिळावा अशी मागणी होऊ लागली.  

      यावेळी अल्पवयीन मुलाच्या नावची २५ टक्के मालमत्ता मयताच्या वारसांच्या नावे करावी,अपघातग्रस्त यूवकांवर कठोर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली. 

      हा आक्रोश पुणे पोलीस आयुक्त व मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पर्यंत जाण्यासाठी अखिल भारतीय कोष्टी कोष्टा फेडरेशन व विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,देवांग कोष्टी समाज पुणे,अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषद व महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ अरुणजी वरोडे, राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिस आयुक्त यांना समक्ष भेटून निवेदन देवून आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज भेटले, सुमारे ३० मिनीट चर्चा झाली व सक्त कारवाई करण्यात येईल याची ग्वाही देखील पोलीस आयुक्त यांनी शिष्टमंडळाला दिली,

        याप्रसंगी विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे बालाजी चिनके,सुनील ढगे,दत्ता ढगे, मंजुषा फासे,सौ स्वाती डहाके , अशोक भूते, भगवान गोडसे,  सुनिल डहाके,सतिश लिपारे, राजेंद्र खटावकर,राजेंद्र चोथे , आश्विन चोथे,पुंडलिक पोहेकर, अमोल तावरे,प्रणव तावरे, उल्हास कुमठेकर,शांताराम डोईफोडे,सोमनाथ टिकोळे, अलोक टिकोळे ईत्यादी कोष्टी कोष्टा समाज बांधव उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️