मोठा वाघोदा येथे गॅस्ट्रो सदृश्य आजाराची लागण : डिएच ओ,जिल्हा आरोग्य अधिकारीसह डॉक्टरांचा ताफा वाघोद्यात.

 


मोठे वाघोदा प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दुषीत पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची घटना घडली आहे. वाघोदा येथील २० ते २२ सावदा येथील वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.तर निंभोरा पीएचसी त आरोग्य अधिकारी डॉ चंदन पाटील मोठा वाघोदा आरोग्य केंद्रात आरोग्य वैद्यकीय सीएचओ आरोग्य सहाय्यक यांचे कडून रुग्णांवर उपचार करण्यात आले तर काहींवर उपचार सुरु आहेत.वाघोदा गावातील गणेश नगर, आंबेडकर नगर, मोठा वाडा, बेघर वस्ती रमाई नगर या भागातील या रुग्णांना उलट्या मळमळ व अतिसाराची लक्षणे दिसल्याने व रुग्ण वाढल्याने  हा प्रकार निदर्शनास आला आहेत.त्यामुळे यांच्या वर उपचार सुरु आहेत.[ads id="ads1"]  

या घटनेने तालुका वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले.असले तरी  तालुका आरोग्य अधिकारी यांना सकाळी १० वा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मात्र असला कुठलाही प्रकार वाघोदा गावात नसल्याचे सांगत स्पष्ट इन्कार केला व घटनेला बगल देण्याचा प्रयत्न केला.  दूषित पाण्यामुळे किंवा ऊन लागल्यामुळे रुग्णांना ही लक्षणे जाणवत असल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज खाजगी डॉक्टरांकडून वर्तवला गेला मात्र हा गावातील अनेक भागात आढळल्या मुळे व रुग्ण वाढल्याने दुपारी 3 वा प्राथमीक आरोग्य केंद्रात डॉक्टर व अधिकारी यांचा ताफा हजर झाला व त्यांनी सर्व आरोग्य सेवक व ग्रामपंचायतकडुन संपुर्ण माहीती घेतली व गावात पाणी तपासणीच्या सुचना दिल्या. तेव्हापासुन आरोग्य केंद्रात गावातील गॅस्ट्रोस्रदृश्य  लागण झालेल्या आजाराच्या रुग्णांची माहिती गोळा करणे चालू असून पाण्याची ओटीए तपासणी देखील चालू करण्यात आली आहे.[ads id="ads2"]   

  मोठा वाघोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा व औषधी  उपलब्ध नसल्याचे काही रुग्णांना निंभोरा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.तत्पुर्वी ग्रामविकास अधिकारी  सरपंच यांनी आरोग्य केंद्रात रुग्णांना पुरेशी  पलंग किंवा जागा नसल्याचे रुग्णांसाठी मंडप बिछाईत गादीची तात्काल व्यवस्था करण्यात आली कुणालाही गॅस्ट्रो सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित निंभोरा येथील  आरोग्य उपकेंद्र  आयव्हीं व औषधोपचार उपलब्ध असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.यावेळी वाघोदा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ धापटे.जिल्हा साथरोग अधिकारी डॉ बाळासाहेब वाभळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजय रिंढे डॉ सचिन ठाकुर लोहारा . डॉ निरज पाटील चिनावल,आरोग्य विस्तार अधिकारी अब्दुल दस्तगीर, तालुका आरोग्य सहाय्यक राजेश खैरनार यांनी भेट दिल्या व सर्व माहीती घेऊन सुचना दिल्या तसेच शेजारच्या प्रा.आ.केंद्र ऐनपुर येथील कर्मचारी आरोग्य सहाय्यक श्री एम.ए.पवार आरोग्य निरीक्षक श्री सी.व्ही.पाटिल आरोग्य सेवक श्री चंद्रकांत चौधरी, कैलास महाजन,डि.के. नमायते., खुशाल सुरजागडे, कैलास सरोदे, सुभाष ठाकुर, जीवन सोनवणे, शुभम महाजन, तुषार महाजन,प्रशांत नरवाडे यांचे सह सर्व कर्मचारी वर्ग हे सहकार्य साठी उपस्थित झाले होते. मुक्ताईनगर विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील रावेर गटविकास अधिकारी सौ दिपाली कोतवाल जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायकळ यांचेसह निंभोरा,चिनावल, ऐनपुर सह तालुक्यातील पीएचसी च्या वैद्यकीय अधिकारी प.स.आरोग्य विस्तार अधिकारीसह कर्मचारी यांनी पाहणी केली तसेच आणखी रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही? तसेच निंभोरा येथील आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ चंदन पाटील आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उद्या दि २२रोजी सकाळी ८:३० वाजेपासून रुग्ण तपासणी होम टू होम तसेच कॅम्प लावून तपासणी करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️