रावेर लोकसभा मतदारसंघात ५५:३६ टक्के मतदान शांततेत


 यावल ( सुरेश पाटील )

रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे.सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली.दुपारी उन्हाचा कडाका वाढत असताना सुद्धा नागरिकांचा मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला दुपारी ५ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली.रावेर लोकसभा मतदारसंघात 55.36% मतदान झाले आहे.[ads id="ads1"]  

रावेर लोकसभा मतदारसंघात यावल तालुक्यात वड्री गावात बुथ क्र. 25 मधील मतदान मशीन खराब असल्यामुळे सकाळी 8 वाजून 45 मिनिटांपर्यंत एकही मतदान झाले नव्हते.तहसीलदार सौ. मोहनमाला नाहीरकर यांनी मशीन तज्ञांकडून मशीन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू केल्याने मतदान प्रक्रिया तात्काळ सुरू झाल्याची माहिती तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी परंतु मशीन कासव गतीने चालत असल्याने यावल येथील साने गुरुजी विद्यालयात मतदारांची रांग लागली होती.तालुक्यात तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.[ads id="ads2"]  

लोकशाही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बूथ भेटी..!

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून,आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.रावेर लोकसभेत सुध्दा मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला. 

याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभेतील फैजपूर,यावल, रावेर शहरात येणाऱ्या तसेच परिसरातील विविध गावांतील बूथ केंद्रावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे भेटी दिल्या.यावेळी बूथवर मतदानाचा आढावा घेत कार्यकर्ता बंधुंशी चर्चा व विचारपूस केली.तसेच सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनम्र आवाहन करून आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून घेतले.

यावल नगर परिषद माजी नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांनी येथील माध्यमिक कन्या शाळा येथे कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क, मतदान केंद्रात आदिवासी विकास विभागातर्फे उभारण्यात आलेल्या आदिवासी संस्कृती व जीवनमान देखाव्याचे केले कौतुक.



जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️