साईट पट्ट्या नसलेला आणि जागोजागी खड्डे असलेला यावल भुसावल रोड ; सा.बां.विभाग.ठेकेदार झाला आंधळा..? निकृष्ट आणि अपूर्ण कामाचा परिणाम

 


यावल  ( सुरेश पाटील ) यावल भुसावळ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम यावल शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर नुकतेच दोन-तीन महिन्यापूर्वी बोगस आणि निकृष्ट प्रतीचे झाले.त्यानंतर राजोरा फाट्यापासून अंजाळे गावाजवळील पाटचारी जवळील मुंजोबा मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला या रस्त्यावर साईट पट्ट्यांचे काम न झाल्याने आणि यावल भुसावळ रोडवर ठिकठिकाणी जिव घेणे आणि अपघातास कारणीभूत ठरणारे खड्डे असल्याने याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार आंधळ्याची भूमिका निभावत असल्याने संपूर्ण वाहनधारकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]  

          यावल भुसावळ रस्त्यावर यावल शहरातील मिनीडोर रिक्षा स्टॉप पासून म्हणजे सम्राट मॉलच्या पुढे, बीएसएनएल ऑफिस जवळ पेट्रोल पंप समोर भर रस्त्यात आडवी खोल चारी पडल्याने, भुसावळ नाक्याजवळ वळणावर आडवा खड्डा पडल्याने तसेच यापुढे महाराष्ट्र ढाप्या जवळ भर रस्त्यात मोठा खड्डा पडल्याने तसेच ठीक ठिकाणी खड्डे पडल्याने, राजोरा फाट्यापासून रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम झाले परंतु ठेकेदाराने साईट पट्ट्यांचे काम अपूर्ण ठेवले आहे.[ads id="ads2"]  

  साईट पट्ट्यांवर आजही कामाच्या रिकाम्या गोण्या पडलेल्या असल्याने आणि साईट पट्ट्या न भरल्याने,साधी दुचाकी सुद्धा रस्त्याच्या खाली उतरू शकत नाही,आणि रोडवर रोडच्या सेंटरला आणि साईट पट्ट्यांवर पांढरे पट्टे न मारल्यामुळे अपघात आणि जीवित आणि होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,अंजाळे गावाजवळ डांबरीकरणाचे काम कासव गतीने सुरू असून काम अपूर्ण आहे हा सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता व कामावर निरीक्षण करणाऱ्या अभियंत्याला तसेच ठेकेदाराला दिसून येत नसल्याने हे जाणून बुजून आंधळ्याची भूमिका निभावत आहेत का..? असा प्रश्न संपूर्ण यावल तालुक्यासह भुसावळ विभागात उपस्थित केला जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️