रावेर तालुक्यात बिबट्याने केल्या सहा शेळ्या फस्त : नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

 

रावेर तालुक्यात बिबट्याने केल्या सहा शेळ्या फस्त :  नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील सिंगत (Singat Tal Raver Dist Jalgaon) येथे बिबट्याने रात्री येऊन वाड्यातील सहा बकऱ्यांची शिकार केल्याने नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.[ads id="ads1"]  

 सिंगत ता. रावेर जि. जळगाव येथील मुकेश विश्वनाथ पाटील यांच्या गावाशेजारी असलेल्या वाड्यात असलेल्या सहा शेळ्या बिबट्या ने रात्री च्या वेळी येऊन दोन शेळ्या ची नरडि फोडून मारल्या तर बाकी च्या शेळ्याना ओढून वाड्याजवळ असलेल्या वनीकरण मध्ये घेऊन गेल्याचे आढळून आले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून या पोटी भरपाई भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तर बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी सुद्धा मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.[ads id="ads2"]  

सदर ठिकाणी वनविभागाचे अधिकारी (Forest Officer) येऊन त्यांनी पंचनामा करून पुढील तपास करणार असल्याचे सांगितले. तसेच (Nimbhora Police Station) निंभोरा पो. स्टे. चे अढागळे यांनी भेट देत पाहणी केली. व सिंगात गावातील सर्व नागरिक यांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभाग व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️