रावेर तालुक्यातील 35 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील उटखेडा (Utkheda Tal Raver Dist Jalgaon) येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 26 मे रोजी सकाळी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. [ads id="ads1"]  

   रावेर तालुक्यातील उटखेडा (Utkheda Tal Raver Dist Jalgaon) येथील योगेश रमेश बारी( वय ३५) याने त्याच्या रहाते घरात छताच्या लाकडी बल्लीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.[ads id="ads2"]  

   याबाबत निलेश बारी यांनी दिलेल्या खबरीवरुन रावेर पोलिस स्टेशन मध्ये (Raver Police Station) दिनांक 26 मे रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे (Raver Police Station) पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सतिश सानप हे करित आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️