रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर शहरातील पेट्रोलपंप आवारातील असलेल्या वॉटर कूलरवर पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.सदर ही दुर्दैवी घटना रविवारी दिनांक 19 मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. [ads id="ads2"]
ध्रुवकुमार चरणसिंग कुशवाह वय २६, मूळ रा. भिंड म. प्र. , ह.मु. श्रीकृष्ण नगर, रावेर असे या मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो राष्ट्रीय महामार्गालगतच्या श्रीराम पेट्रोलपंपाजवळ पाणीपुरीचा व्यवसाय करायचा यासाठी पाणी भरण्यासाठी तो गेला होता. पेट्रोल पंप व्यवस्थापक व ध्रुवचा भाऊ शिवम या दोघांनी त्यास रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉ. वीरेंद्र ताटकर यांनी त्याला मृत घोषित केले.