वेसाक्को पौर्णिमा/वैशाख पौर्णिमा निमित्त विशेष लेख

 


🌕२३ मे २०२४ रोजी..बुध्द पौर्णिमा.🌕

🌕(वेसाक्को पौर्णिमा/वैशाख पौर्णिमा)🌕

 👉 सिद्धार्थ गौतमाचा लुम्बिनी शालवनात जन्म, सिद्धार्थ गौतमाला बोधगया येथील पिंपळ वृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्ती आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे कुशीनारा येथे शालवृक्षाखाली महापरिनिर्वाण अशा त्रिगुणी पावन बुध्द पौर्णिमेच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा!

----------------------------------------

☸️तथागत भगवान सिद्धार्थ गौतमांच्या बुद्धांच्या जीवनात सर्व पौर्णिमांचे महत्त्व आहे।त्यामध्ये विशेषतः वैशाख पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे।तथागतांच्या जीवनातील काही महत्त्वांच्या खालील घटना वैशाखी पौर्णिमेच्या असल्याने जगातील बौद्ध धर्मीय लोक वैशाखी पौर्णिमा मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरी करतात।

[ads id="ads1"]  

(१)कपिलवस्तुचा शाक्य वंशीय राजा शुध्दोधन आणि राणी महामाया यांचा राजपुत्र सिध्दार्थ गौतमाचा जन्म लुम्बिनी वनात शाल व्रुक्षाखाली इ.स.पू. ५६३ वैशाख पौर्णिमा.वार मंगळवार.


(२)राजपुत्र सिध्दार्थ गौतमाचा व युवराज्ञी यशोधरेचा विवाह १६ व्या वर्षी - इ.स.पू. ५४७. वैशाख पौर्णिमा.


(३) सिध्दार्थ गौतमाला सम्यक संबोधी ज्ञानप्राप्ती गया येथील निरंजना नदीकाठी असलेल्या पिंपळ व्रुक्षाखाली ३५ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमा इ.स.पू.५२८ बुधवार.


(४)तथागतांचे महापरिनिर्वाण मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शालवनात जोडशाल व्रुक्षाखाली ८० व्या वर्षी- इ.स.पू.४८३. शुक्रवार.

----------------------------------------[ads id="ads2"]  

☸️ सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमाला जम्बुद्विपात काही विभूतींचा जन्म झाला. (उत्पन्न झालेत)।


(१)कपिलवस्तु नगरीच्या शेजारी रामग्राम नगरीत कोलीय वंशीय राजा सुप्पबुध्द अर्थात दंडपाणी आणि राणी पमिता यांची कन्या युवराज्ञी 'यशोधरा' (गोपा), सिद्धार्थ गौतमाची पत्नी, राहुल माता चा जन्म.


(२)राजा शुध्दोधनाचा भाऊ अमितोदन याचा पुत्र व सिध्दार्थ गौतमाचा चुलत भाऊ आणि प्रिय शिष्य, 'आनंद'महास्थविराचा जन्म याच दिवशी.


(३)सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या दिवशीच राजा शुध्दोधनाचा अमात्य उदासेन याचा पुत्र व पुढे सिध्दार्थ गौतमाचा मित्र 'कालुदायी'चा जन्म झाला.ज्याला सिद्धार्थ गौतमाच्या महाभिनिष्क्रमणा नंतर शुद्धोधन राजाने मंत्री बनविले.


(४)सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या दिवशीच सिध्दार्थ गौतमाचा सारथी 'छन्न' चा जन्म झाला.


(५)सिध्दार्थ गौतमाचा प्रिय अश्व ,ज्यावर आरुढ होऊन महाभिनिष्क्रमण केले 'कन्थक' चा जन्म याच दिवशी.


(६)अजानीय गजराजा चा जन्म याच दिवशी.


(७)सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या दिवशीच गया/उरुवेला येथे बोधीव्रुक्षाचा (पिंपळ )जन्म झाला.


(८) सात सुवर्ण कलषाची निर्मिती वैशाख पौर्णिमेला.सोन्या चांदीचे पुर्ण भरलेले पात्र जे पूर्णपणे उपभोग घेऊनही कधीही रिक्त होत नाही.

----------------------------------------

☸️विशेष म्हणजे.. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर २३१ वर्षांनी श्रीलंकेत देवाणप्रिय तिष्य राजाचा राज्यभिषेक इ.स.पू.२५३ मध्ये वैशाख पौर्णिमेला करण्यात आला.


☸️वरील सर्व घटनांचा आजच्या वैशाखी पौर्णिमेचा अद्भुत मंगल संयोग आहे.


जगाला शांतीचा संदेश देणारे, "लाईट ऑफ एशिया", करुणासागर,महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या...सर्वाना मंगलमय शुभेच्छा!

🙏नमोबुध्दाय🙏जयभीम🙏

-----------------------------------


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️