होय,मी बाळासाहेब.....होय मी वंचित..... या संकल्पनेतून.... प्रचार आणि प्रसार.....!!


        *सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून मी अनोमदर्शी तायडे  उदळी बुद्रुक येथील रावेर तालुका सचिव, निलेश बाऱ्हें, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजू बाऱ्हें, सरताज वाघ, अमोल बार्हे, शरद बाऱ्हें, यांच्यासह जळगाव जिल्हा महासचिव ॲड.योगेश तायडे सह,आपले सर्व वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवी, जे बाळासाहेबांवरती अतोनात प्रेम करतात त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो .....!!*

        *आपण स्वयंप्रेरणने, उदळी बुद्रुक येथून जवळपास दहा गावांमध्ये अत्यंत रखरखत्या उन्हात कोणत्याही प्रकारच्या मानपान, पैसा अडका याचा विचार न करता फक्त वंचित बहुजन आघाडीचा मताचा टक्का कसा वाढेल?  यासाठी सकाळपासून 04 रावेर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इंजि. संजय पंडित ब्राह्मणे यांचा म्हणजेच बाळासाहेबांचा प्रचार आणि प्रचार करीत आहात त्याबद्दल आपलं मनस्वी खूप खूप धन्यवाद.....!!*

        *कारण, आज आपल्यासारखी तरुण मुलं चळवळीचा भाग होणे हे फार गरजेचे आहे. आपण आज जे केलं हाच कित्ता जर रावेर तालुक्यातील प्रत्येक तरुणांनी गिरवला तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वाईट बाबींना सामोरे जावे लागणार नाही.....!!*

        *आपणच आपले पत्रकार, आपणच आपले संपादक,  आपणच आपले मीडिया बनून जर प्रचार केला तर आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही.....!!*

        *कारण, आज वंचितची ताकद ही जनतेला कळायला लागलेली आहे. म्हणूनच गावात शिरण्या अगोदर लोक वंचित बाबत विचारणा करत आहेत. फक्त जबाबदारी या ठिकाणी वंचितच्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला, सहकार्याला हीच पार पाडायची आहे की, इंजि. संजय पंडित ब्राह्मणे यांची निशाणी गॅस हंडी ही लोकांपर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचवता येईल.....!!*

        *म्हणूनच मी पुन्हा म्हणेल की, पुढील पाच दिवस रावेर तालुक्यातील प्रत्येक तरुणाने ही जबाबदारी पार पाडावयाची आहे. पदाधिकारी येवो अथवा ना येवो,  उमेदवार येवो अथवा ना येवो,  आपणच उमेदवार आहात आणि आपणच बाळासाहेब आहात ही भूमिका जेव्हा आम्ही घेणार तेव्हा आम्हाला सत्तेत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.....!!*

        *त्यासाठी येणारे पाच दिवस शक्य होईल त्याला त्याने वंचित साठी द्यावे, बाळासाहेबांसाठी द्यावे, समाजासाठी द्यावे एवढेच नव्हे तर बापाला या वेळेच्या 14 एप्रिल ची आदरांजली म्हणून  अर्पण करावे.....!!*

        *या ठिकाणी लिहिताना  एकच सांगेल, होय मीच वंचित आहे...., होय मीच बाळासाहेब आहे...., या ध्येयाने प्रेरित व्हा व येणाऱ्या विधानसभा निवडणुका हे स्वतःच्या पक्षाच्या निशाणी वरती लढवा.....!!*

        *कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या लोकसभेला पक्षाचे चिन्ह अधिकृत करावयाची आहे. या ध्येयाने पेटून उठा.!      पूर्ण रावेर तालुका पिंजून काढा एवढंच या ठिकाणी सांगेल कारण, उद्यापासून मी स्वतः प्रचारांमध्ये उतरत आहे. आपणही यावं ही माझी अपेक्षा.....!!*

 आपलाच 

*अनोमदर्शी तायडे (सर)*

   9823663185

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️