रावेर प्रीमियर लीग सिझन ३ चा विजेता ठरला पाटील योद्धा संघ


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

     क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सरदार जी जी स्पोर्ट क्लब व युवराज माळी मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन वर्षांपासून रावेर प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले जाते. सलग वर्ष तिसऱ्या वर्षी रावेर येथील व्यवसायिक दिलीप हिरामण पाटील यांचा पाटील योद्धा हा संघ विजेता ठरला. [ads id="ads1"]  

    याबाबत अधिक वृत्त असे की, गेल्या ८ दिवसांपासून सुरु असलेल्या रावेर प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेस रावेर शिक्षण संवर्धक संघ, यशवंत विद्यालय, अंबिका व्यायाम शाळा, सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब, युवराज माळी मित्र परिवार यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण स्पर्धेत एकूण ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या ६४ खेळाडूंची एकूण ८ संघात विभागणी करण्यात आली होती. या ८ संघांचे संघमालक म्हणून डॉ. संदीप पाटील (माऊली सुपर किंग्स), दिलीप हिरामण पाटील (पाटील योद्धा), शीतल पाटील (एस पी टायगर्स), अतुल विंचूरकर (साई काम्पुटर के चॅम्पियन), सुरज चौधरी (बालाजी वारियर्स), यशवंत दलाल (श्रीनाथ वारियर्स), राजेंद्र चौधरी (रॉयल राज इन्फ्रा), प्रल्हाद पाटील (मोरगाव पलटण) यांनी संघनिवड करून आपले योगदान दिले. [ads id="ads2"]  

       या सर्व संघांत एकूण २८ साखळी सामने खेळवण्यात आले. यातील गुणतालिकेत वरील ४ संघाना उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला. यात पाहिला सामना पाटील योद्धा व साई कॉम्पुटर के चॅम्पियन या संघात झाला. यात पाटील योद्धा हा संघ विजयी झाला. व दुसऱ्या उपांत्य फेरीत अगदी अटीतटीच्या सामन्यात बालाजी वारियर्स या संघाने निसटता विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश घेतला. 

       अंतिम सामन्यात पाटील योद्धा या संघाने एकतर्फी विजय मिळवत विजेते पदावर आपले नाव कोरले. तर बालाजी वारियर्स हा संघ उपविजेता ठरला व साई कॉम्पुटर के चॅम्पियन हा संघ तृतीया क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट रेडर चा बहुमान  ...... या खेळाडूला मिळाला व बेस्ट डिफेंडर म्हणून कृष्णा पाटील यांस गौरविण्यात आले. 

      रावेर व परिसरातील खेळाडूंचे मनोबल वाढावे म्हणून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांचे तर्फे देण्यात आली. तसेच द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्व. कलेश नामदेव महाजन यांचे स्मरणार्थ अमोल कलेश महाजन यांच्या तर्फे देण्यात आली. तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्व. राजाराम शेठ विष्णू शेठ सोनार यांचे स्मरणार्थ अशोक राजाराम सोनार यांचे तर्फे देण्यात आली. व बेस्ट डिफेंडर ची ट्रॉफी विकास देशमुख यांचे तर्फे देण्यात आली आणी बेस्ट रेडर ची ट्रॉफी स्व. कल्पेश दिनकर चौधरी यांचे स्मरणार्थ सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब तर्फे देण्यात आली. 

      शेवटच्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावेर विधानसभेचे आमदार शिरीषदादा चौधरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कांतीलाल महाजन, पद्माकर महाजन, प्रदीप मिसर, रवींद्र महाजन, संतोष शेठ अग्रवाल, विकास देशमुख, सुरज चौधरी, अशोक सोनार, निलेश महाजन, अमोल महाजन, युवराज महाजन, भूपेश जाधव मान्यवर उपस्थित होते. 

      स्पर्धेच्या यशस्वितेसाठी युवराज माळी, अजय महाजन, भूषण चौधरी, प्रतिक खराले, जयेश बिरपन, चेतन महाजन, जितेंद्र वानखेडे, राम चौधरी व सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब च्या खेळाडूंनी परिश्रम घेतले. 

     सूत्रसंचालन भूषण चौधरी यांनी केले तर आभार युवराज माळी यांनी मानले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️