लाचेची मागणी करणाऱ्या रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

 

लाचेची मागणी करणाऱ्या रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल



विवरे बु ता. रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शासकीय कागदपत्रे काढून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजार रुपयाची लाच मागणी करणार्‍या रावेर तालुक्यातील विवरे येथील ग्रामविकास अधिकार्‍यावर निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. डिगंबर जावळे असे ग्रामविकास अधिकार्‍याचे नाव आहे. परंतू संशयीत हा पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.[ads id="ads1"]  

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक गावातील रहिवाशी असून त्यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी शासकीय कागदपत्रे पाहिजे होते. यासाठी त्यांनी विवरे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयातून नमुना नंबर 8, फेरफार दाखला, चर्तुसीमा व ना हरकतीचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून देण्याची मागणी  विवरे येथील ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली. परंतू शायकीय कागदपत्रे काढून देण्याच्या मोबदल्यामध्ये ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी १० हजार रुपये लाच मागितली होती व त्याचदिवशी तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीत आरोपीने ५ हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. मात्र आरोपीला सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर आरोपीविरोधात मंगळवारी ३० एप्रिल रोजी निंभोरा पोलिसात (Nimbhora Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी हा पसार झाला आहे.[ads id="ads2"]  

सदरची कारवाई  ही जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, चालक एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️