शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिराजवळ तापी नदी पात्रात पाण्यात बुडून २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू ; जळगाव येथील २ मुलांचा समावेश

 


यावल ( सुरेश पाटील ) यावल तालुक्यातील शिरागड येथे आई सप्तशृंगी देवी मंदिराजवळील तापी नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी  गेलेले जळगाव येथील २ सतरा वर्षीय मुले पाण्यात बुडून मरण पावल्याची दुखद घटना घडल्याने यावल तालुक्यासह जळगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads1"]  

      तालुक्यातील शिरागड येथे आज सोमवार दि.१५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सप्तशृंगी देवी मंदिराजवळ १७ वर्षीय २ मुले तापी नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांना तापी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघं पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली, सदरचे दोघं १७ वर्षीय तरुण जळगाव येथील रामानंद नगर आणि वाघनगर येथील रहिवासी असून ते आपल्या नातेवाईकांकडे ( बकऱ्या चार णारे आहेत किंवा कसे याबाबतची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे ) आले होते आणि देवीच्या मंदिराजवळ स्नान करण्यासाठी तापी नदी पात्रात गेल्यानंतर घटना घडली. [ads id="ads2"]  

 घटनास्थळी काही उपस्थितानी  तात्काळ त्यांना बाहेर काढून यावल रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्या दोघ मुलांना मृत घोषित केले.यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सिकंदर तडवी, भरत कोळी तपास करीत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️