यावल ( सुरेश पाटील ) येथील तत्कालीन तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील तहसीलदार महेश कौतिकराव पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये नवापूर पोलीस ठाणे जिल्हा नंदुरबार येथे दि.२१ नोव्हेंबर २०२३ रोजी गुन्हा नोंद क्र.५८४ / २०२३ दाखल झाला आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लाचखोर तहसीलदार महेश पवार यास दि.२६ मार्च २०२४ पासून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे.[ads id="ads1"]
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग क्र. बैठक २०२३/ प्र. क्र. ११/ ई ४ अ ( भाग - २ ) २१ मार्च २०२३ नुसार तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रकरणात अटक करण्यात आल्यास आणि त्यांचा पोलीस अभिरक्षेतील कालावधी ४८ तास किव्वा ४८ तसा पेक्षा जास्त असल्यास त्यांना म.ना.से. ( शिस्त व अपील ) नियम १९७९ तील ४ ( २ ) अ नुसार शासन सेवेतून निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्याचे संबंधित विभागाचे विभागीय आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याने नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महेश पवार यांना निलंबित केले.[ads id="ads2"]
निलंबन कालावधी त महेश पवार यांचे मुख्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये त्यांच्या निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता देण्यासाठी खालील आदेश देण्यात आले आहे निलंबनाच्या कालावधीत महेश पवार यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा करू नये त्यांनी कसे केले असते दोषार उपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांचे विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल व तसे केल्यास ते निलंबन निर्वाह भत्ता गमावण्यास पात्र ठरतील निलंबनाच्या कालावधीत त्यांना निलंबन भत्ता जेव्हा देण्यात येईल त्या प्रत्येक वेळी आपण खाजगी नोकरी स्वीकारली नाही किंवा कोणताही खाजगी धंदा व व्यापार करीत नाही अशा तऱ्हेचे प्रमाणपत्र महेश पवार यांना द्यावे लागणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील ६८ मधील तरतुदीनुसार महेश पवार यांना निलंबन निर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येतील.
याबाबत आदेशाच्या प्रति महेश पवार यांच्यासह नंदुरबार जिल्हाधिकारी,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नंदुरबार,नवापूर पोलीस निरीक्षक,महसूल व वन विभाग उपसचिव यांच्या संबंधितांकडे माहितीस्तव प्रति नाशिक विभागीय आयुक्त यांनी रवाना केले आहेत.
पवार यांच्या आदेशाची चौकशी झाल्यास यावल तालुक्यातील अनेक बेकायदा प्रकरणे उघडकीस येथील यावल येथे तहसीलदार म्हणून महेश पवार कार्यरत असताना त्यांच्या कालावधीत त्यांनी दिलेल्या आदेशासह प्रकरणांची चौकशी झाल्यास महेश पवार यांनी आर्थिक प्राप्तीसाठी सोयीनुसार कशाप्रकारे आदेश काढले आहेत हे सर्व उघड झाल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.